भंडी शेगाव, पंढरपुर, ६ जानेवारी २०२२ : सध्या जीवघेण्या स्पर्धेमुळे माणूस आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय.त्यामुळे असाध्य रोगांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेद ही काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.भंडी शेगाव येथे आयोजित शिवकमल निसर्गोपचार व आयुर्वेद, केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी मोहोळचे आमदार यशवंत माने, सं. शि. वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की इंग्रजांनी भारतामधून संपत्ती पेक्षा जास्त आयुर्वेद ग्रंथ पळवले आणि तेच ज्ञान आपल्याला प्रचंड किमतीत आपल्याला विकत आहेत.आयुर्वेदात प्रचंड ताकद आहे हे मी जवळून पाहिले आहे.हरित क्रांती झाली परंतु हायब्रीड मुळे खरा वान निघून गेला आहे त्याचे परिणाम शरीरावर होत आहेत.काळाची पाऊले ओळखून सर्वांनी आयुर्वेदाकडे गेले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने कार्यकर्माच्या अध्यक्ष स्थानी होते, प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या आरोग्याकडे वरचेवर लक्ष दिले पाहिजे, निसर्गोपचार व आयुर्वेद केंद्राच्या माध्यमातून संपूर्ण परिसरातील असाध्य आजाराचे रुग्णावर उपचारासाठी डॉ शिनगारे यांनी एक एकर परिसरात उभा केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले, यामुळे रुग्णांची सेवा चांगल्या पद्धतीने होईल असा विश्वास व्यक्त केला,
आपले मनोगत व्यक्त करताना कल्याणराव काळे यांनी डॉ सुधीर व डॉ सौ जया शिनगारे यांच्या कार्याचे कौतुक करत सध्या धावपळीच्या जीवनात लोकांना अनेक आजार जडलेत त्यावर फक्त निसर्गोपचार,आयुर्वेद केंद्रातच उपचार होवू शकतात. असे सांगितले,कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ सुधीर शिनगारे यांनी केले , पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्व प्रकारच्या सोयी, सुविधा ,निवासी व डे केअर पद्धतीने ,उपलब्ध असणारे हे पहिले केंद्र असल्याचे सांगून,निसर्गोपचार व आयुर्वेद ,पंचकर्माच्या सहाय्याने ,तज्ञ डॉ व स्टाफच्या मदतीने सेवा देणार असल्याचे सांगितले ,माजी सरपंच संजय रणखांबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व या केंद्राचे माध्यमातून गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे असे म्हटले,तर आभार डॉ गजानन मोरे यांनी मानले.
आयुर्वेद तज्ञ डॉ गूळमकर,डॉ गजानन मोरे,डॉ जयश्री शिनगारे,डॉ दिपाली मोरे,डॉ अमृता म्हेत्रे ,सद्दाम मनेरी ,आण्णासो डूबल आदींनी कार्यक्रम संपन्न करण्यास परिश्रम घेतले
कार्यक्रमाला युवा नेते योगेश दादा पवार,पुण्याचे अभियंता अनिल बाबर,ट्वेंटी वन शुगर परळी चे जनरल मॅनेजर सुहास शिनगारे, माजी नगसेवक विलासराव साळुंखे,डॉ संग्राम गायकवाड,डॉ अजित जाधव,डॉ सतीश होनराव,डॉ गणेश अंबिके,डॉ सतीश जगदाळे,विठ्ठल कारखान्याचे संचालक समाधान काळे,महादेव देठे,यशवंत पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे,डॉ सूरज तंटक,राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व्यापार सेल चे राज्याध्यक्ष नागेश फाटे,सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक मोहन नागटिळक,राजाराम पाटील, पोपट गाजरे,पत्रकार मुजू तांबोळी,गणेश जाधव,डॉ शेटे,धीरज मोरे,वैभव सस्ते,जब्बार तांबोळी,प्रकाश मोरे,मंगेश सासणे, माजी उपसभापती शिवाजीराव कोळवले,माजी मार्केट कमिटी माजी उपसभापती गंगाधर विभुते,माजी सरपंच राजाभाऊ माने,माजी संचालक हणमंत सूरवसे,प्रकाश यलमार,रमेश शेगावकर,जुलूस शेख,माजी प्राचार्य भाऊसाहेब जगताप,अशोक यलमार,डॉ श्रीधर यलमार,डॉ मेलगे,डॉ गांधी,डॉ सुरवसे,आबासाहेब दैठणकर, मधूकर गिद्दे,संतोष ननवरे, धनाजी कवडे,शेतकरी संघटनेचे नवनाथ माने,पंचायत समिती सदस्य सौ पल्लवी कंडरे, अजित राडे, लक्ष्मण गलांडे ,राज्यभरातून आलेले डॉक्टर,यांच्यासह सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,नागरिक उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी