गोवा निवडणूक: मनोहर पर्रीकरांचा मुलगा उत्पलची फडणवीसांवर टीका

पणजी, 17 जानेवारी 2022: माजी केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना भाजपकडून अद्याप तिकीट मिळालं नसलं तरी त्यांनी गोव्यात प्रचाराला सुरुवात केलीय. यापूर्वी त्यांनी मनोहर पर्रीकर यांचा मतदारसंघ असलेल्या पणजीमध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला होता, जिथून ते तिकीटाची मागणी करत आहेत. ही सीट खूप चर्चेत आहे.

दरम्यान, भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केवळ मनोहर पर्रीकर किंवा एखाद्या नेत्याचा मुलगा असल्याने त्याला भाजपच्या तिकिटासाठी पात्र ठरवता येणार नाही, असं म्हटलंय. शनिवारी पणजीमध्ये उत्पल घरोघरी जाऊन लोकांना मतदान करण्याचं आवाहन करताना दिसले. उत्पल यांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावरही जोरदार टीका केलीय.

ते म्हणाले, ‘गोव्यात जे राजकारण सुरू आहे, ते मला सहन होत नाही. हे मला मान्य नाही. उत्पल एका मुलाखतीत म्हणाले की, फडणवीस म्हणतात की जिंकण्याची क्षमता हाच निकष आहे का? चरित्र निरर्थक आहे का? आणि तुम्ही गुन्हेगारी इतिहास असलेल्या व्यक्तीला तिकीट देणार आहात आणि आम्हाला घरी शांत बसावं लागंल का?” पणजी मतदारसंघातील विद्यमान आमदार अतानासियो मोन्सेरात यांना भाजपने पक्षाचं तिकीट दिल्यास आपण गप्प बसणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

दरम्यान, गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या हेमा सरदेसाई म्हणाल्या की “मला टीएमसीकडून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची ऑफर मिळाली आहे आणि इतर पक्ष पाठिंबा देण्यास तयार आहेत. मात्र उत्पल निवडणूक लढवत असतील तर मला लढण्याची गरज नाही. हा तोच चेहरा आहे ज्याची पणजीला गरज आहे.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा