प्रयागराज, 30 जानेवारी 2022: छत्तीसगडमध्ये झालेल्या धर्म संसदेचा विवादित भाषेतील वाद अजूनही थंडावलेला नाही तोच आता प्रयागराजमध्ये अशीच आणखी एक धर्म संसद स्थापन झाली असून, तिथं पुन्हा वादग्रस्त विधानांचा वर्षाव झालाय. केवळ यति नरसिंहानंद आणि वसीम रिझवी उर्फ जितेंद्र त्यागी यांच्या सुटकेची मागणीच नाही तर काही मोठे प्रस्तावही देशाच्या सरकारसमोर ठेवण्यात आले आहेत.
हिंदु राष्ट्र निर्माण करण्याची मागणी
पहिल्या ठरावात धर्म संसदेत उपस्थित संतांनी भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याचे सांगितलंय. दुसऱ्या ठरावात धर्मांतराची प्रकरणं पूर्णपणे थांबवण्यासाठी कायदा आणखी कडक करण्याची मागणी करण्यात आली आणि धर्मांतर करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तिसर्या ठरावात हरिद्वार धर्म संसदेत प्रक्षोभक भाषणं देणारे स्वामी यती नरसिंहानंद आणि जितेंद्र त्यागी उर्फ वसीम रिझवी यांची बिनशर्त सुटका करण्याची मागणीही करण्यात आली.
त्याच महामंडलेश्वर प्रभुदानंद महाराजांनी इस्लाम धर्माबद्दलचा राग व्यक्त करत हिंदूंना कबुतर म्हणून संबोधलं आणि मुस्लिमांना जिहादी मांजर म्हटलं. जो देशविरोधी कारवायांमध्ये गुंतला आहे आणि जो हिंदूंचा आदर करू शकत नाही, त्यांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशात जावं, असं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं.
शस्त्रं बाळगली पाहिजे
केशरी महाराज यांनी या धार्मिक संसदेतून मुस्लिमांच्या जातींची गणना केली असून तीन ठिकाणांहून फतवे निघत असल्याचं सांगितलंय. या संस्था रद्द कराव्यात, अशी मागणी भारत सरकारकडं केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वती म्हणाले की, आपल्या देवी-देवतांकडून शिक्षण घेतल्यानंतर हातात शस्त्रं धारण केली पाहिजेत.
आधी आडवा, थांबवा आणि ऐकत नसेल तर मारा असंही त्यांनी सांगितलं. देशाचं संरक्षण बजेट वाढवण्याचं आवाहनही त्यांच्या वतीनं करण्यात आलं आणि देशद्रोह्यांना गरम तेलानं आंघोळ घालण्यात यावी असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून स्वीकारण्यासही नकार दिला आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारताचे पहिले पंतप्रधान म्हटलं.
हिंदूंना पाच मुलं असावीत…
उत्तराखंड सरकारने नरसिंहानंद यति आणि जितेंद्र नारायण त्यागी यांची एका महिन्याच्या आत बिनशर्त सुटका करावी, अशी मागणी शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वती यांनी धर्म संसदेत केली आहे. तसं न झाल्यास बंडखोरीचा इशारा देण्यात आलाय. धर्मांतर करणाऱ्यांना फाशी द्यावी आणि हिंदूंनी पाच मुलं जन्माला घालावीत, असंही ते म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे