पुणे, 12 फेब्रुवारी 2022: वर्षभरापूर्वी याची किंमत फक्त तीन रुपये होती. Flomic Global Logistics या लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंगसारख्या सेवा पुरवणाऱ्या कंपनीने शेअर बाजारात परतावा देण्याच्या बाबतीत मोठ्या कंपन्यांना मात दिलीय. गेल्या 1 वर्षात या स्टॉकने आश्चर्यकारक उड्डाण घेतलं आहे. या 1 वर्षात हा स्टॉक सुमारे 5,000 टक्के वाढला आहे.
गेल्या वर्षी 8 फेब्रुवारीला हा स्टॉक फक्त 2.93 रुपये होता. सध्या तो BSE वर 145 रुपयांच्या जवळ पोहोचलाय. हा एका वर्षात 4,900 टक्क्यांहून अधिक परतावा आहे. या कालावधीत सेन्सेक्स केवळ 13.41 टक्क्यांनी वाढला आहे. सेन्सेक्स हा BSE वर सूचीबद्ध 30 सर्वात मोठ्या कंपन्यांचा इंडेक्स आहे. याचा अर्थ असा की देशातील 30 मोठ्या सार्वजनिक कंपन्यांचे शेअर्स 1 वर्षात 13.41 टक्के परतावा देऊ शकले आहेत, तर या पेनी स्टॉकने अनेक पटींनी भरघोस परतावा दिलाय.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याच्या पोर्टफोलिओचं मूल्य सुमारे 50 लाख रुपयांनी वाढलं असतं. आजही बाजार लक्षणीय खाली असताना, हा पेनी स्टॉक ग्रीन पोजिशन मध्ये आहे. BSE वर, हा शेअर सुमारे 1 टक्क्यांच्या वाढीसह 145 रुपयांच्या आसपास ट्रेडिंग करत आहे.
BSE वर उपलब्ध आकडेवारीनुसार, सध्या या कंपनीचा mcap सुमारे 100 कोटी रुपये आहे. हा शेअर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 216 रुपयांवर पोहोचला होता. कंपनीच्या दोन प्रमोटर्सकडं कंपनीचा 27.49 टक्के हिस्सा आहे. सार्वजनिक भागधारकांकडं कंपनीचा 72.51 टक्के हिस्सा आहे. 9,829 सार्वजनिक भागधारकांकडौ कंपनीचे 52.20 लाख शेअर्स आहेत.
सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला नफ्यात घट झाल्याचा सामना करावा लागला. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा 17.65 टक्क्यांनी घसरून 0.70 कोटी रुपयांवर आलाय. तथापि, विक्री 100 टक्क्यांनी वाढून 80.44 कोटी रुपये झालीय. कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल अद्याप जाहीर केलेले नाहीत. मार्च 2021 ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा नफा 5,040 टक्क्यांनी वाढून 2.47 कोटी रुपये झालाय.
(शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीत अनेक धोके असतात. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही स्वतःचं संशोधन केलं पाहिजे किंवा तुमच्या वैयक्तिक वित्त सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे