स्वराज्याचे थोरले धनी…दैवत…..

!! श्री. छत्रपती शिवाजी महाराज !!
जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
सन महाराष्ट्राच्या शौर्याचा

“शिवाजी” काय जादू आहे या नावात अजुन ही या मातीत जन्मालेल्या पोराला सांगावं लागत नाही.

या नावात आसलेली पराक्रमाची अन असामान्य गोष्ट सिद्ध करून दाखवण्याची धमक अजुन ही नीतीने कमी केली नाही. राजांचं राजपन हे ठराविक कालखंडापुरतं नव्हतं ते आज ही आबादित आहे अन येणाऱ्या विज्ञानाच्या युगात ही राहील.

त्यांचा जीवनातील प्रत्येक प्रसंग काहीतरी नविन अन जीवनाला कलाटणी देणारा आहे म्हणून आजही महाराष्ट्रातीलच नाही तर जग भरातुन त्यांचे आनुयायी अन शिवप्रेमी रायगडावर आजही मुजऱ्याला गर्दी करतात.

या तीन आक्षराभोवती घुटमळून बऱ्याच इतिहासकारांच्या लेखनीतील शाई संपली पण मराठ्यांचा बलिदानाचा अन पराक्रमाचा शेवट त्यांना सापडेना. म्हनुनच जगभरात त्यांचा गनिमीकावा आज ही पाठ्यपुस्तकांमधे आभ्यासला जातो.

जगभरातील मला वाटत नाही की हे कोणा राजाच्या वाट्याला आलं असंल.
“शिवाजी” ही अक्षर जर उलटी वाचलीत तर “जिवाशी” हा शब्द होतो जो राजा आयुष्यभर गोरगरीब रयतेसाठी जिवाशी लढला तो शिवाजी.

अश्या रयतेच्या राजाला माझा तीन हात मुजरा अन त्यांना घडवणाऱ्या माऊलीस लाख लाख दंडवत.

ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
।। राजा शिवछत्रपती ।।

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा