विराट कोहलीच्या 100व्या कसोटीत 50 टक्के प्रेक्षक येऊ शकणार, BCCI चा मोठा निर्णय

मुंबई, 2 मार्च 2022: मोहाली येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यासाठी 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. विराट कोहलीची ही 100वी कसोटी असेल, त्यामुळे या ऐतिहासिक क्षणासाठी बीसीसीआयने आपला जुना निर्णय बदलला आहे.

यापूर्वी, कोरोनामुळे बीसीसीआयने मोहाली कसोटीत प्रेक्षकांच्या प्रवेशाला मान्यता दिली नव्हती. पण आता पंजाब क्रिकेट असोसिएशनकडून 50 टक्के प्रेक्षकांना एंट्री मिळणार असल्याचं वक्तव्य करण्यात आलं आहे. बुधवारी सकाळी पंजाब क्रिकेट असोसिएशनची बैठक होणार असून, त्यामध्ये गर्दीबाबत नियोजन केले जाणार आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही निवेदन दिले

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यावेळी निवेदन दिले की, मैदानात प्रेक्षकांच्या प्रवेशाचा निर्णय राज्य संघटना घेते. मी त्याच्याशी बोललो आहे, आता चाहत्यांना इथे एंट्री मिळणार आहे. आम्ही सर्व घरच्या मालिका चाहत्यांशिवाय सुरू केल्या, त्या ठिकाणच्या परिस्थितीच्या आधारे चाहत्यांच्या प्रवेशाचा निर्णय घेतला जात आहे.

जय शाह यांनी विराट कोहलीचे 100 व्या कसोटीसाठी अभिनंदन केले आणि तो आमचा चॅम्पियन खेळाडू असल्याचे सांगितले. भविष्यातही तो देशासाठी अनेक सामने खेळेल, अशी आशा आहे.

सध्याच्या काळातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक विराट कोहली या मोठ्या कामगिरीसाठी पूर्णपणे तयार आहे. विराट कोहली विश्रांतीनंतर पुनरागमन करत आहे आणि आता त्याच्या शंभरव्या कसोटीत चाहत्यांसमोर असेल. भारताकडून 100 कसोटी सामने खेळणारा विराट कोहली हा 12 वा क्रिकेटपटू ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा