गुगलीचा जादुगाराची जादू संपली

तो आला , त्याने गुगली टाकली आणि समोरचा क्लीन बोल्ड… ही जादू होती ॲास्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेर्न वॅार्नची … नुकतेच ५२ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आणि फिरकी गोलंदाजांचा अंत झाला. थायलंडमधील त्याच्या घरात ते बेशुद्धअवस्थेत आढळले. वैद्यकिय पथकाने खूप प्रयत्न करुन हि त्यांना वाचवू शकले नाही.

शेर्न वॅार्न हे एक वादळ होतं… जे संपलं. वॅार्नने १४५ कसोटीत ७०८ बळी घेतले. वॅार्नच्या नावावर अनेक विक्रम आहेत . वॅार्नने कसोटीत १७ वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. कसोटीत सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार पटकावणारा वॅार्न तिसरा खेळाडू आहे. एका वर्षात सर्वाधिक ९६ विकेट मिळवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये १७६१ षटके निर्धाव टाकली आहेत. या विक्रमात तो मुरलीधरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मात्र वॅानला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होतं. २००३ मध्ये वर्ल्ड कपपूर्वीच डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने त्याला एक वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागले. त्यानंतर २००६ मध्ये त्याने निवृत्तीची घोषणा केली. वेगवेगळ्या लीगमध्ये खेळलानंतर २०१३ मध्ये त्याने क्रिकेटला रामराम केला आणि आपला क्रिकेट प्रवास संपवला .

सचिन तेंडूलकर यांनी वॅानला आदरांजली वाहिली . तेव्हा त्यांनी सांगितले की मित्रा मला तु स्तब्ध केलेस. मैदानाच्या बाहेर तुझे हास्यविनोद मी मिस करतो. तु माझा कडवा स्पर्धक होतास. तु खूप लवकर सोडून गेलास रे… या शब्दात तेंडूलकरने श्रद्धांजली वाहिली . तर समस्त क्रिकेट विश्वाकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

क्रिकेटविश्वातले हे वादळ अखेर शमलं…

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा