वर्ल्डकपमध्ये आज पाकिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी, पाकिस्तानला विजय आवश्यक

पुणे, २७ ऑक्टोबर २०२३ : आज क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि गुणतालिकेत पिछाडीवर असलेला पाकिस्तान यांच्यात स्पर्धेतील २६ वा सामना खेळवला जाणार आहे. आजचा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर दुपारी २:०० वाजता सुरू होणार असून नाणेफेक दुपारी १:३० वाजता होईल. दक्षिण आफ्रिका ५ सामन्यात ४ विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान संघ सलग तीन सामने गमावून सहाव्या स्थानावर आहे.

पाकिस्तानला उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागतील. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान शाबूत राखण्यासाठी पाकिस्तानला विजय आवश्यक आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका या स्पर्धेसाठी सर्वात मोठा दावेदार असल्याचे दिसत आहे. वर्ल्डकपमध्ये या दोन संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यांपैकी दक्षिण आफ्रिकेने ३ आणि पाकिस्तानने २ जिंकले आहेत. सन १९९९ नंतर दोन्ही संघांमध्ये फक्त २ सामने झाले. त्या दोन्हीमध्ये पाकिस्तानने बाजी मारली. हे सामने २०१५ आणि २०१९ मध्ये खेळले गेले.

दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स / टेंबा बावुमा, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, गेराल्ड कूटझी/ तबरेझ शम्सी, महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.

पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक / फखर जमान मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, उसामा मीर, शादाब खान, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर / हसन अली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा