मुंबई,९ मार्च २०२२ : आज मुंबईतले आझाद मैदान गजबजले. त्याला कारण म्हणजे भाजपचा धडक मोर्चा. इतके दिवस शांत बसलेला भाजप पक्ष आता आक्रमक झालेला दिसत आहे. आज भाजपने आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा येथे हा मोर्चा काढण्यात आला.नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला. ज्या व्यक्तींचे दाऊदबरोबर संबंध आहे, अशा व्यक्तीने मंत्रीमंडळात राहु नये, या साठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. उद्या १० मार्चला पाच राज्यांचे भविष्य उलगडणार असताना , आदल्या दिवशी हा मोर्चा हे भाजपचे कारस्थान की खरी आक्रमकता हे पहावे लागले.
याची खरी ठिणगी पडली ती अधिवेशनात. नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध आहे. तसेच १२५ तासांचे रेकॅार्डिंग ही त्यातली महत्वाची बाब मानावी लागेल. अनिल देशमुख, संजय राठोड यांच्यानंतर मलिकांनी राजीनामा द्यावा , या मागणीसाठी भाजपचा हा मोर्चा हे नक्कीच महत्वाचे पाऊल मानावे लागेल. हा मोर्चा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सुरु झाला. यात कृपाशंकर सिंह, नितेश राणे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रविण दरेकर, असे बडे नेते सहभागी झाले होते.
आम्हाला दाऊद पॅटर्न मान्य नाही. राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशा आक्रमक घोषणा या मोर्चात देण्यात आला.त्याचबरोबर पोलिसांना सहकार्य करा आणि त्यांच्याबरोबर संघर्ष करु नका असे आवाहन फडणवीसांनी केले. यानंतर पोलिसांनी सर्वांना पकडून पोलिस स्टेशनमध्ये नेले. बेईमान आधाडीला नेस्तनांभूत करायचे असे उद्गगार मुनगुंटीवार यांनी काढले तर झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आजचा मोर्चा काढल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.
मात्र फडणवीसांनी बॅाम्ब फोडला आहे तर त्याचे उत्तर गृहमंत्री वळसे-पाटील उद्या देणार असल्याचं सांगितलं. ते काय उत्तर देणार, त्यावर मविआ काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. त्यांवर भाजप आपली नवी रणनीती आणणार, हे नक्की.
न्यूज अनकट प्रतिनिधी -तृप्ती पारसनीस