राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सन्नाटा!

पुणे: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठींबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले तरी देखील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात बारामतीत मात्र शांतता आहे.

त्यामुळे अजित पवार यांच्या भूमिकेबाबत बारामतीकरांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्रीपद मिळून देखील कोणत्याही प्रकारचा जल्लोष कार्यकर्त्यांनी बारामतीमध्ये केला नाही. याउलट सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित पवारांच्या भूमिकेबद्दल वेगवेगळी मत व्यक्त करण्यात आले आहेत.

महाशिवआघाडीचे सरकार होणार हे चित्र स्पष्ट झाल्याच्या क्षणीच बारामतीकरांनी जल्लोष व्यक्त केला होता. शहरातील प्रत्येक चौकात फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली होती. मात्र महाशिवआघाडीला काँग्रेसचा पाठिंबा नसल्याचे लक्षात येताच ही आताषबाजी अर्ध्यावरच थांबली होती.

भाजपच्या गोटात जाऊन अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची माळ स्वतःच्या गळ्यात घालून घेतली. असे असले तरी अजित पवार यांचा निर्णय बारामतीकरांना देखील रुचला नसल्याचे वातावरण आहे. त्यामुळे नेतेमंडळी तरी जोमात असली तरी कार्यकर्ते मात्र कोमात गेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेमुळे आनंद साजरा करायचा या विवंचनेत कार्यकर्ते मात्र सापडले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा