‘किलर’ मिलरची धमाकेदार खेळी, शेवटच्या षटकात गुजरातचा विजय, चेन्नईचा पराभव

GT vs CSK, 18 एप्रिल 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये 17 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलेल्या या रोमांचक सामन्यात गुजरातने 3 गडी राखून विजय मिळवला आहे. डेव्हिड मिलरने संघासाठी 94 धावांची दमदार खेळी खेळली आणि शेवटपर्यंत क्रीजवर राहून संघाला विजय मिळवून दिला.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करत 169 धावा केल्या. सीएसकेसाठी ऋतुराज गायकवाडने 73 धावांची खेळी खेळली, पण यावेळी गुजरातच्या डेव्हिड मिलरची खेळी त्याला जड होती.

शेवटच्या षटकात हव्या होत्या 13 धावा

गुजरात टायटन्सला शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती. चेन्नई सुपर किंग्जने शेवटचे षटक ख्रिस जॉर्डनला दिले, पण डेव्हिड मिलरने शानदारपणे आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

19.1 षटके – 0 धावा
19.2 षटके – 0 धावा
19.3 षटके – 6 धावा
19.4 षटके – 1 धाव (नो-बॉल)
19.4 षटके – 4 धावा (फ्री हिट)
19.5 षटके – 2 धावा

गुजरात टायटन्सचा डाव (170/7, 19.5 षटके)

या सामन्यात गुजरात टायटन्सने केवळ 2 धावांत आपले दोन विकेट गमावल्या. या सामन्यात शुभमन गिल आणि विजय शंकर यांना खातेही उघडता आले नाही. यानंतरही छोट्या अंतराने संघाला धक्के बसले. या मोसमात पहिल्यांदा खेळणाऱ्या ऋद्धिमान साहाला केवळ 11 धावा करता आल्या, तर अभिनव मनोहरला महिष तिक्षनने 12 धावांवर बाद केले.

डेव्हिड मिलरने 94 धावांच्या खेळीत 51 चेंडू खेळले. मिलरने या खेळीत 8 चौकार आणि 6 षटकार मारले. मिलरने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो टी-20 मधील सामना विजेता खेळाडू आहे. मात्र या सामन्यात रशीद खानने धडाकेबाज खेळी करत सर्वांना चकित केले. रशिद खानने केवळ 21 चेंडूत 40 धावा केल्या, रशीदने 3 षटकार आणि 2 चौकार लगावले.

पहिली विकेट – शुभमन गिल 0 धावा, (1/1)
दुसरी विकेट – विजय शंकर 0 धावा, (2/2)
तिसरी विकेट – अभिनव मनोहर 12 धावा (16/3)
चौथी विकेट- वृद्धिमान साहा 11 धावा (48/4)
पाचवी विकेट – राहुल टिओटिया 6 धावा (87/5)
6वी विकेट – राशिद खान 40 धावा (157/6)
7वी विकेट – अल्झारी जोसेफ 0 धावा (157/7)

चेन्नई सुपर किंग्ज डाव (169/5, 20 षटके)

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही, रॉबिन उथप्पा अवघ्या 3 धावा करून बाद झाला. पण दुसरीकडे आनंदाची बातमी आली ती म्हणजे आउट ऑफ फॉर्म ऋतुराज गायकवाड रंगात परतले. ऋतुराजने सुरुवातीपासूनच धावांचा पाऊस पाडला आणि 73 धावांची दमदार खेळी केली. या सामन्यापूर्वी ऋतुराजच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले जात होते.

मात्र या एका खेळीने ऋतुराजने फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. ऋतुराजने 48 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांसह 73 धावा केल्या. ऋतुराजची विकेट पडल्यानंतर कर्णधार रवींद्र जडेजाने छोटी पण तुफानी खेळी केली. रवींद्र जडेजाने 12 चेंडूत 22 धावा केल्या.

• पहिली विकेट – रॉबिन उथप्पा 3 धावा, (7/1)
• दुसरी विकेट – मोईन अली, 1 धाव, (32/2)
• तिसरी विकेट- अंबाती रायडू 46 धावा (124/3)
• चौथी विकेट- ऋतुराज गायकवाड 73 धावा, (131/4)
• पाचवी विकेट – शिवम दुबे 19 धावा (169/5)

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग-11: रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महिश तिक्षन, मुकेश चौधरी

गुजरात टायटन्स प्लेइंग-11: ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा