Truecaller ची मोठी घोषणा, होणार हे लोकप्रिय फीचर बंद, गुगलच्या पॉलिसीचा परिणाम

पुणे, २३ एप्रिल २०२२ : गुगलने कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर कडक कारवाई करण्याची घोषणा केली आहे. ११ मे पासून, गुगल(Google) अनेक नवीन पोलिसिज लागू करेल ज्या अंतर्गत थर्ड पार्टी ॲप्सना अँड्रॉइड (Android) स्मार्टफोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगमध्ये एन्ट्री मिळू शकणार नाही.

गुगलच्या याच पॉलिसी नुसार, Truecaller ने देखील पुष्टी केली आहे की यापुढे Truecaller सह कॉल रेकॉर्डिंग शक्य होणार नाही. हे लक्षात घेण्यासारखं आहे की Truecaller च्या टॉप फ़ीचर्स पैकी एक म्हणजे कॉल रेकॉर्डिंगचे फ़ीचर्स.

भारतातही लोक Truecaller द्वारे कॉल रेकॉर्ड करतात. आता नवीन पॉलिसी आल्याने त्याचा परिणाम येथेही होणार आहे. Truecaller नुसार, आता कंपनी जगभरात कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय देणं बंद करेल.

ज्या स्मार्टफोनमध्ये नेटिव्ह कॉल रेकॉर्डर फीचर दिले आहे ते ११ मे नंतरही कॉल रेकॉर्ड करणे सुरू ठेवू शकतात. परंतु ज्या स्मार्टफोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगसाठी स्वतंत्र ॲप्स डाऊनलोड करण्यात आलं आहे, ते कॉल रेकॉर्डिंग करू शकणार नाहीत.

Truecaller ने एका निवेदनात म्हटलंय की, वापरकर्त्यांच्या प्रतिसादानंतर आम्ही अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी कॉल रेकॉर्डिंग फीचर लाँच केले होते, परंतु आता गुगलच्या अपडेटेड पॉलिसीनंतर, गुगल (Google) कॉल रेकॉर्डिंगची परवानगी मर्यादित करेल आणि त्यामुळे Truecaller वरून कॉल रेकॉर्डिंग देखील बंद होईल.

Apple नेहमी आपल्या iPhone मध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंगची सुविधा देत नाही. काही कॉल रेकॉर्डर ॲप्स ॲप्सस्टोअरवर देखील आढळतील, परंतु ते योग्यरित्या कार्य करत नाहीत आणि काही सशुल्क ॲप्स आहेत.

कॉल रेकॉर्डिंगबाबत अनेक देशांमध्ये वेगवेगळे कायदे आहेत. अनेक देशांमध्ये कॉल रेकॉर्डिंग देखील बेकायदेशीर घोषित करण्यात आले आहे आणि आता अँड्रॉइडमध्ये कॉल रेकॉर्डिंग कठीण होण्यामागं प्रायव्हसी हे देखील एक कारण आहे.

आता हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल की ज्या स्मार्टफोन्समध्ये नेटिव्ह कॉल रेकॉर्डर दिले आहेत, गुगल येत्या काळात त्यांच्यावर कारवाई करणार की नाही?

न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा