मुंबईने रोहितच्या वाढदिवशी मिळवला विजय, राजस्थानला पराभूत करून खंडित केली पराभवाची मालिका

RR vs MI, 1 मे 2022: मुंबई इंडियन्सला अखेर या मोसमातील पहिला विजय मिळालाय. कर्णधार रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव करत विजय मिळवला. या मोसमातील सलग 8 पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा हा पहिलाच विजय आहे, त्यामुळं संघ आणि चाहत्यांसाठी तो खूप संस्मरणीय ठरला.

मुंबई इंडियन्सला शेवटच्या षटकात विजयासाठी चार धावांची गरज होती, पण किरॉन पोलार्ड पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र, पुढच्याच चेंडूवर डॅनियल सॅम्सने षटकार ठोकून सामना संपवला आणि मुंबईला मोसमातील पहिला विजय मिळाला.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 158 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने अखेर हे लक्ष्य गाठले. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 51 धावांची शानदार खेळी खेळली. मात्र, बर्थडे बॉय रोहित शर्मा केवळ 2 धावा करून बाद झाला.

मुंबई इंडियन्सचा डाव

पहिली विकेट – रोहित शर्मा 2 धावा, 23/1
दुसरी विकेट – इशान किशन 26 धावा, 41/2
तिसरी विकेट- सूर्यकुमार यादव 51 धावा, 122/3
चौथी विकेट – टिळक वर्मा 35 धावा, 122/4
पाचवी विकेट – किरॉन पोलार्ड 10 धावा, 155/5

राजस्थान रॉयल्सचा डाव 158/6

या सामन्यात राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही आणि देवदत्त पडिक्कल लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला. एका बाजूने विकेट पडत होत्या, तर दुसरीकडं जोस बटलर उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत होता. या मोसमात बटलरचं वेगळं रूप पाहायला मिळत आहे, जिथं तो विरोधी संघावर पाऊस पाडत आहे. या सामन्यातही जोस बटलरने 67 धावा केल्या. शेवटी रविचंद्रन अश्विनने 21 धावांची तुफानी खेळी करत संघाला 158 पर्यंत मजल मारून दिली.

पहिली विकेट – देवदत्त पडिककल 15 धावा, 26/1
दुसरी विकेट – संजू सॅमसन 15 धावा, 54/2
तिसरी विकेट – डॅरेल मिशेल 17 धावा, 91/3
चौथी विकेट- जोस बटलर 67 धावा, 126/4
पाचवी विकेट – रियान पराग 0 धावा, 130/5
6वी विकेट – रविचंद्रन अश्विन 21 धावा, 155/6

या सामन्यात मुंबई इंडियन्सने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. डेवाल्ड ब्रेविस आणि जयदेव उनाडकटच्या जागी टीम डेव्हिड आणि कुमार कार्तिकेयला संधी देण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघात कोणताही बदल झालेला नाही.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन: जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (सी/डब्ल्यू), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, डॅरिल मिशेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, प्रणंद कृष्णा, युझवेंद्र चहल.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), टिम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, हृतिक शोकीन, डॅनियल सॅम्स, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, जसप्रीत बुमराह.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा