भंडारा, 7 मे 2022: भंडारा पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा दबदबा दिसून आला आहे. भंडारा जिल्ह्यात एकूण 7 पंचायत समिती आहेत, त्यातील 4 पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व दिसून आलंय. उर्वरित 3 सभापती पदांवर काँग्रेस आणि भाजप यांना विजय मिळालाय. त्यात काँग्रेसला 2 सभापती पदांवर समाधान मानावं लागलंय तर भाजपला एक सभापती पदावर समाधान मानावं लागलंय.
राष्ट्रवादी बाबतीत बोलायचं झालं तर राष्ट्रवादीला जिल्ह्यात चार सभापती मिळाले आहेत. यामध्ये मोहाडी, लाखांदूर, पवनी व भंडारा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे सभापती निवडून आले. यानुसार भंडारा पंचायत समितीत रत्नमाला चेटुले, लाखांदूरला संजना वरखडे, पवनीत नूतन कुरझेकर, तर मोहाडीत रितेश वासनिक यांची सभापती पदावर निवड झालीय.
इतर पदांबाबत बोलायचं झालं तर तुमसर भाजपाचे नंदू रहांगडाले तर साकोलीत काँग्रेस गणेश आले व लाखनीत प्रणाली सारवे पंचायत समितीपदी निवडून आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे