पंजाबी गायक सिद्धू मुसावाला याची नुकतीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या संदर्भात पोलिसांना नवीन धागे दोरे सापडल्याने पोलिस हैराण झाले आहेत. मुसावाला याला मारण्यासाठी आठ महिने आधीच हत्यार मागवण्यात आले होते. हे हत्यार कधी, कुठे आणि कसे मागवण्यात आले, याचा थांगपत्ताही पोलिसांना कसा लागला नाही , असा सवाल मूसावालाचे कुटूंबिय करत आहेत.
या संदर्भात नुकतेच तिहार जेलमध्ये कैदी असलेल्या लॅारेन्स बिश्नोई याची चौकशी केली असतां, त्याने आठ महिन्यांपूर्वी नेपाळहून एका गॅंगस्टरकडून हत्यार मागवले असल्याचे कबूल केले. स्पेशल सेलतर्फे केलेल्या चौकशीत बिश्नोई याने सांगितले की, सहा महिन्यापूर्वीच कॅनडातील गॅंगस्टर गोल्डी बराड याला मेसेज पाठवला होता. सहा महिन्यांपूर्वीच मूसावाला हत्येचा कट रचला गेला असल्याचे बिश्नोई याने कबूल केले. अकाली नेतां विकी मिड्डूखेडा याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मूसावाला याची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. विकी हा माझ्यासाठी मोठ्या भावासारखा होता. ७ ॲागस्ट २०२१ ला विकीची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येचा बदला मी मुसावालाची हत्या करुन घेतला, असे त्याने पोलिसांना सांगितले . पूर्वी बिश्नोई तिहार जेलमध्ये मोबाईल वापरत होता. त्यानंतर जॅमर लावल्याने मोबाईलच वापर करु शकला नाही.
मूसावाला याला अंतिम निरोप देताना त्याच्या वडिलांनी आपली बहुमूल्य पगडी काढून सीबीआयकडे ही केस सोपवून लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार शोध सुरु झाला आणि तपास पुढच्या टप्यावर गेला असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. या तपासात अजून काय हाती सापडतय , हे पहावं लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस