ही आमची राजकीय यात्रा नाही तर तीर्थ यात्रा… आदित्य ठाकरे

अयोध्या, 15 जून 2022: आज आदित्यं ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज दिवसभर त्यांच्या या दौऱ्याची माध्यमांमध्ये चर्चा रंगली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, हा माझा राजकीय दौरा नसून तीर्थ यात्रा आहे. तसेच त्यांनी मंदिर उभं राहत असल्याने कोर्टाचे आभार देखील मानले.

काय म्हणाले आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्याला आठवत असेल की, 2018 मध्ये पहिल्यांदा मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आलो होतो. तेव्हा त्यांनी ही घोषणा केलेली की “पहिले मंदिर फिर सरकार”. योगायोगाने जेव्हा नोव्हेंबर 2018 मध्ये आलो होतो त्या नंतर लगेचच कोर्टाच्या प्रक्रियेला चालना मिळाली. त्या नंतर बरोबर एक वर्षानंतर म्हणजेच नोव्हेंबर 2019 च्या आसपास कोर्टाचा निकाल आला. कोर्टाच्या निर्णयामुळंच आज इथं मंदिर निर्माण होत आहे त्याचे आम्ही आभार मानतो.”

आमची राजकीय यात्रा नाही…

पुढं बोलताना ते म्हणाले की, “प्रसारमाध्यमांनी आत्ता राजकीय न दाखवता जे काही सगळं चालू आहे ते दाखवावं. ही आमची राजकीय यात्रा नाही तर तीर्थ यात्रा आहे. इथं आम्ही राजकारण करायला आलो नाही तर दर्शन घ्यायला आलो आहोत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा