जितेन्द्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानचे पेण पोलिस ठाण्यात निवेदन

पेण, रायगड ५ जानेवारी २०२४ : ३ जानेवारीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात आमदार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री राम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे समस्त हिंदू धर्मियांचे मन दुखावले असुन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन आज पेण सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने पेण पोलिस ठाण्यात देण्यात आले.

वनवासात असताना प्रभू श्री राम हे शिकार करून मांसाहार करायचे असे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. मात्र आमच्या दृष्टीने कंदमुळे खाऊन चौदा वर्षे वनवास भोगणारे प्रभू श्री राम हे शुद्ध शाकाहारी होते. तसा रामायणातील एका अध्यायात उल्लेख देखील आहे आणि वनवासात जाताना त्यांनी घेतलेली शपथ हा देखील पुरावा आहे. त्यामुळे प्रभू श्री राम हे मांसाहारी कसे असा सवाल करून जर गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानचे पेण तालुका अध्यक्ष साईराज कदम यांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे.

या वादग्रस्त वक्तव्याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन देताना सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, जेष्ठ समाजसेवक भाई पोटे, उपाध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, सूर्यकांत तांबोळी, ऍड.सूरज पाटील, मयूर चाळके, दिलीप पाटील उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : स्वप्नील पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा