अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी येथून आलेल्या अक्षता जालना शहरातील जागृतेश्र्वर गणपती मंदिरात पोहोचल्या

जालना ५ जानेवारी २०२४ : अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी येथून आलेल्या अक्षता कलश हा जालना शहरातील भाग्योदय नगर येथील जगृतेश्वर गणपती मंदिरात दाखल झाला. यावेळी भक्तांच्या हस्ते कलशाचे विधिवत पूजन करून आरती करण्यात आली. २२ जानेवारी रोजी आयोध्येत प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

या सोहळ्याचे निमंत्रण प्रत्येक घराघरात अक्षता वितरित करून दिले जात असून जिल्ह्यात १ जानेवारी पासून अक्षता वितरण कार्यक्रमाला सुरुवात झालीय. १५ जानेवारी पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक गावात या अक्षता पोहोचतील व प्रत्येक हिंदू कुटुंबापर्यंत त्या वाटल्या जाणार आहेत. जिल्ह्यात अक्षतांची जवळपास एक हजार पाकिटे आली असून प्रत्येकी १ किलोचे हे पाकीट जिल्ह्यातील ९६५ गावे, वाड्या आणि वस्त्यांपर्यंत ६ लाख घरांना वाटून अयोध्याला येण्याचे निमंत्रण भक्तांना दिले जात आहे.

अयोध्या येथून आलेला कलश जालना शहरातील भाग्योदय नगर येथील गणपती मंदिरात ठेवण्यात आला असून भाग्योदय नगर येथील घराघरात आजपासून अक्षता देऊन २२ जानेवारी रोजीच्या सोहळ्याला येण्याचे निमंत्रण दिले जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा