पेगासससारखं आणखी एक स्पायवेअर आलं समोर, लोकांची हेरगिरी करून बनवते असं लक्ष्य

पुणे, 19 जून 2022: पेगासस स्पायवेअरचं नाव अनेकांनी ऐकले असेल. लोकांची हेरगिरी करण्यासाठी वापरलं जाणारं हे सॉफ्टवेअर जगभरातील अनेक सरकारे वापरत होते. भारतातही यावर बराच गदारोळ झाला होता.

आता अशाच आणखी एका सॉफ्टवेअरचं नाव समोर येत आहे, जे पेगासससारखं धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. Hermit नावाचं नवीन स्पायवेअर लोकांची हेरगिरी करण्यासाठी वापरलं जात आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, हे स्पायवेअर लोकांची हेरगिरी करण्यासाठी अनेक देशांमध्ये वापरलं गेलंय.

मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षकांसह सरकारी अधिकारीही या यादीत सामील आहेत. एसएमएसद्वारे लक्ष्याच्या फोनवर स्पायवेअर इंस्टॉल केलं जातं. हे स्पायवेअर प्रथम कझाकस्तानमध्ये आढळलं होतं.

अनेक देशांमध्ये नवीन स्पायवेअर आढळलं

पुढील काही दिवसांत सीरिया आणि इटलीमधील युजर्सच्या फोनमध्ये हर्मिट स्पायवेअरही दिसलं. सुरक्षा संशोधक लुकआउटच्या मते, हा स्पायवेअर पहिल्यांदा कझाकिस्तानमध्ये एप्रिलमध्ये आढळला होता. वृत्तानुसार, कझाकिस्तान सरकारच्या धोरणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनानंतर हा स्पायवेअर आढळून आला होता.

संशोधकांनी त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘आमच्या विश्लेषणावर आधारित, हर्मिट स्पायवेअर इटालियन स्पायवेअर विक्रेते RCS लॅब आणि टायकेलॅब Srl यांनी विकसित केलंय. ही एक टेलिकम्युनिकेशन सोल्यूशन कंपनी आहे, जी या स्पायवेअरच्या मागे काम करत आहे.

Android वापरकर्ते लक्ष्य

सीरिया आणि इटलीमधील लोकांची हेरगिरी करण्यासाठी हर्मिटचा वापर केला गेला आहे. लुकआउटनुसार, मालवेअर सर्व Android आवृत्त्यांवर काम करतो.

वृत्तानुसार, एसएमएसद्वारे लक्ष्याच्या फोनवर संशयास्पद सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्यात आलं होतं. हे अगदी फिशिंग हल्ल्यासारखे आहे. या प्रकारचे स्पायवेअर अद्याप iOS वर आढळलेले नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा