दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या SpiceJetच्या विमानात खराबी, पाकिस्तानमध्ये आपत्कालीन लँडिंग

नवी दिल्ली, 5 जुलै 2022: स्पाइसजेटच्या विमानात आज समस्या आली, त्यानंतर ते कराचीला वळवावे लागले. एसजी-11 हे विमान दिल्लीहून दुबईला जात होतं. मात्र बिघाडामुळे ते पाकिस्तानकडं वळवावे लागलं. विमानाच्या इंडिकेटर लाइटमध्ये काही समस्या आल्याचे सांगण्यात आलंय.

स्पाइसजेटचे विमान कराचीत उतरल्यानंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. हे इमर्जन्सी लँडिंग नव्हतं, फ्लाइट सामान्य पद्धतीनं लँड करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. आता दुसरे विमान कराचीला पाठवण्यात आलंय. ते प्रवाशांना दुबईला घेऊन जाईल.

याप्रकरणी डीजीसीएचं वक्तव्यही आलं आहे. असे सांगण्यात आलं की स्पाइसजेट विमानाच्या क्रूच्या लक्षात आलं की फ्यूल टैंक इंडिकेटर इंधनाचं प्रमाण वेगाने कमी होत असल्याचं दाखवत होतं. यानंतर तपासणीत काहीही चुकीचं आढळून आलं नाही, टाकीत कुठूनही गळती झालेली नाही. पण इंडिकेटर अजूनही कमी इंधन दाखवत होतं. त्यामुळं विमान कराचीत उतरवण्यात आलं.

याच महिन्यात 2 जुलै रोजी स्पाइसजेटच्या विमानात समस्या निर्माण झाली होती. त्यानंतर दिल्लीहून जबलपूरला जाणाऱ्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. त्यानंतर केबिनमध्ये धुराचे लोट उठताना दिसले. स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने अशी माहिती दिली की, उड्डाणानंतर विमान 5000 फूट उंचीवर पोहोचले तेव्हा पायलटच्या केबिनमध्ये धूर दिसला. यानंतर विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आलं.

गेल्या महिन्यात 19 जूनलाही स्पाइसजेटच्या विमानात समस्या निर्माण झाली होती. हे विमानही दिल्लीहून जबलपूरला जात होतं. त्याच्या केबिन प्रेशरमध्ये समस्या होती. यामुळे विमान पुन्हा दिल्लीला आणण्यात आलं. त्याच दिवशी स्पाइसजेटच्या आणखी एका विमानात बिघाड झाला. हे विमान पटनाहून दिल्लीला येत होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा