२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याला ११ वर्षं पूर्ण होत आहे. या हल्ल्यात १६४ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. मुंबई पोलिसांचे कर्तबगार अधिकारी विजय साळस्कर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे या हल्ल्यात शहीद झाले होते. तुकाराम ओंबाळे यांनी आपल्या प्राणांची आहुती देत अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडलं होतं.
मृत्यू पावलेल्या प्रमुख व्यक्तीसंपादन करा
प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांसह सतरा पोलिस वीरमरण पावले आहेत.
तुकाराम ओंबळे – सहाय्यक उपनिरिक्षक, मुंबई पोलिस. यांनीच कसाबवर झडप घालून पकडून ठेवले व स्वत:चे प्राण गमावले.
हेमंत करकरे – मुंबई दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी
अशोक कामटे – ऍडिशनल पोलिस कमिशनर
विजय साळसकर – एनकाउंटर स्पेशालिस्ट
शशांक शिंदे – वरिष्ठ पोलिस निरिक्षक
मेजर संदीप उन्नीकृष्णन – एन.एस.जी. कमांडो अधिकारी
हवालदार चंदर – एन.एस.जी. कमांडो
हवालदार गजेंदर सिंह बिष्ट – एन.एस.जी. कमांडो
छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे तीन रेल्वे कर्मचारी गोळीबाराला बळी पडले.