राष्ट्रवादीतून राजकारणाला सुरुवात, पवारांनी तिकीट नाकारलं , झोकात सेना प्रवेश, थाटात खासदार

33

पुणे, १९ जुलै २०२२: उगवत्या सूर्याला नमस्कार करत अनेक सेना पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील होत आहेत. मातोश्री आणि ठाकरेंचे कट्टर निष्ठावंत शिवाजीराव आढळराव पाटलांनीही २० दिवसांच्या संयमानंतर अखेर शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. काल शिंदे गटाने बोलविलेल्या बैठकीला आढळरावांनी ऑनलाइन उपस्थिती लावून उद्धव ठाकरेंची साथ सोडली.

राष्ट्रवादीतून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. पण पवारांनी खासदारकीचं तिकीट नाकारल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि थाटात तीन वेळा शिवसेनेचा भगवा फडकवला. काल मात्र उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करुन त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

शिवाजीराव आढळराव पाटील हे आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी गावचे. त्यांच्या राजकीय सुरुवात राष्ट्रवादी पक्षातूनच झाली. भीमाशंकर साखर कारखाना उभारनीत आढळराव पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. ते भिमाशंकर साखर कारखान्याचे पहीले चेरमन होते.

मात्र २००४ साली त्यांना लोकसभा निवडनूक लढवायची असल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्याकडे लोकसभेचं तिकीट मागितलं होतं. त्यावेळी पवारांनी तिकीट देण्यास नकार दिला. मग त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

२००४ साली शिवसेनेकडून त्यांनी लोकसभा निवडनूक लढवून पहिल्यांदा संसदेत पाय ठेवला. शिवसेनेचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे ते पहिले खासदार झाले.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर