पुणे, २० जुलै २०२२: सध्या स्टॅण्डअप कॉमेडियन स्वाती सचदेव सध्या चर्चेत आहे. नुकतीच तीने आपलं स्टेटस बायसेक्सुअल असल्याचं सांगितंल. यावरुन अनेक वादंग माजले आहेत.
पण त्यामुळे पुन्हा एकदा एलजीबीटी या संदर्भातले वाद उफाळून आलेत. मुळात एलजीबीटी म्हणजे काय यावर एक प्रकाश झोत टाकणं गरजेच आहे.
एल म्हणजे –लेसबियन- या प्रकारात मुंलींना प्रेम करण्यासाठी, लाईफ पार्टनर म्हणून मुलीच आवडतात. यांच्या आय़ुष्याच्या व्याख्या खूप वेगळ्या असतात. ज्यात एका कपलमध्ये दोन्हीतली एक मुलगी ही मुलासारखे राहणीमान करुन रहात असते. यांच्या विश्वात इतर कोणाला जास्त वाव नसतो. पण नंतर या मुलींना मानसिक त्रासाला जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं. अमेरिकेने केलेल्या सर्वेक्षणात ३५ टक्के स्त्रिया या लेसबियन असून त्यात १३ टक्के स्त्रिया आपल्या पालकांशी बोलून नात्याची कबूली देतात.
जी- गे ही सध्या जास्त प्रमाणात रुजू झालेली वृत्ती आहे. ज्यात दोन मुले नातेसंबंधात असतात. पुण्यातील समीर समुद्र आणि अमित गोखले ही पहिली भारतीय जोडी होती, ज्यानी कायद्यानुसार लग्न केले आहे. या
बी- बायसेक्युअल, यात मानसिक आणि शारिरीकरित्या मुले आणि मुली यांच्याशी संबंध प्रस्थापित केले जातात. अशा लोकांची संख्या अजूनही कळू शकली नाही. पण अशा व्यक्तींची मानसिकता कायम चलबिचल असते.
टी- ट्रान्सजेंड्रर, पुरुषाला पहिल्यापासून आपल्यात स्त्रीत्व असल्याची जाणीव होणे. यामुळेच त्यांना महिलांच्याप्रमाणे राहणी आवडते. अशा लोकांनी नंतर सर्जरी करुन स्वत:चे जेंडर बदलल्याची अनेक उदाहरणे आहेत. याचे प्रमाण सध्या ४५ टक्क्यांवर गेले आहे. प्रसिद्ध डिझायनर स्वप्नील शिंदे हे याचं उत्तम उदाहरण असून आता सायशा शिंदे या नावानी आता ती प्रचलित आहे.
खरं तर अशा विषयांवर खूप लिहीता येऊ शकतं. कारण अशा कथा कायम संघर्षात्मक आहेत. पण सध्या तरी एवढाच …
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस