पुणे महानगरपालिकेत बंपर भरती! वाचा रिक्त जागांचा तपशील

पुणे, २१ जुलै २०२२: पुणे महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागांतर्गत सहाय्यक विधी अधिकारी, लिपीक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक यासारख्या विविध वर्ग २ आणि वर्ग ३ च्या पदांच्या ४४८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या पदांसाठी ऑनलाइन अर्जाची लिंक अधिकृत संकेतस्तळावर म्हणजेच pmc.gov.in उपलब्ध आहे. पीएमसी ऑनलाइन अर्ज २० जुलै २०२२ पासून उपलब्ध असेल. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी किंवा त्यांपूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

एकून रिक्त पदांपैकी लिंपीक टंकलेखक २००, कनिष्ठ अभियंता साठी १४४, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक १००, आणि सहाय्यक विधी अधिकारी पदांसाठी ४ रिक्त जागा आहेत. पुणे महानगरपालिकेनं जारी केलेल्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं कमीत कमी वय १८ वर्ष आणि जास्तीत जास्त ३८ वर्ष असावं.

पीएमसी रिक्त जागा तपशील

असिस्टेंट लीगल ऑफीसर – ०४ क्लर्क टंकलेखक- २०० कनिष्ठ अभियंता(सिव्हिल)-१३५ पदे कनिष्ठ अभियंता
(मेकॅनिकल)-०५ पदे कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) -०४ सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक १००

पात्र आणि इच्छुक उमेदवार २० जुलै २०२२ ते १० ऑगस्ट २०२२ पर्यत ऑनलाइन अर्ज करु शकतात.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरावं लागेल. दुसरीकडे, आरक्षित प्रवर्गासाठी ८०० रुपये शुल्क भरावे लागेल.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा