२२ जुलै २०२२ : फेसबुकने अखेर अफगाणिस्तानचे पेज आपल्या यादीमधून काढून टाकले आहे. तालिबान ही दहशतवादी संघटना असल्यामुळे फेसबुकने अफगाणिस्तान आणि तालिबानचे पेज यादीमधून काढून टाकले आहेत.
मागच्या वर्षी तालिबान ने फेजबुक, ट्विटर यांचा वापर अनेक प्रक्षोभक बातम्या दाखवण्यासाठी केला होता. ज्यावर फेसबुकला कुठलेही बंधन ठेवता आले नव्हते.
त्याचबरोबर तालिबानने फेसबुकवरील वर्तमान पत्रे, रेडीयो आणि टेलिव्हिजनवर युटूबवरील मॅटर हा सतत दाखवून लोकांना भडकवण्याचे काम केले होते.
अमेरिकन कायद्यानुसार तालिबान ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित झाली आहे. त्यामुळे अशा संघटनांनी मेटा किंवा फेसबुक पेज वापरुन त्याचा गैरवापर केला, तर फेसबुकचे नाव आणि इमेज खराब होऊ शकते, असे फेसबुकच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
फेसबुकवरुन केवळ योग्य, उपयुक्त आणि चांगली माहिती प्रसारित व्हावी, हा फेसबुकचा उद्देश आहे. मात्र जवळ जवळ १० ते १५ लाख लोकांनी तालिबानला फेसबुकवर ब्लॉक केलं. बॅन तालिबान या सदराखाली या लोकांनी ब्लॉक केल्याने फेसबुकचे नुकसान झाले आहे.
याचा परिणाम उलट होऊ शकतो. याचा विचार करुन अखेर फेसबुकने हा निर्णय घेतला आहे. तालिबान सारख्या संघटना कुठल्याही प्रकारे या माध्यमाचा अतिरेकी वापर करु शकतात, या एका संकेतामुळे तालिबान आणि अफगणिस्तान ही पेजेस अखेरीस फेसबुकने घेतला. या कार्यवाईवरुन फेसबुकला देर आए, दुरुस्त आए… असंच म्हणावे लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस