मुंबई, २२ जुलै २०२२: अभिनेता सुमित राघवन पुन्हा बाबा झालाय. अं. हं .घाबरु नका. यावेळी तो एका विचीत्र पद्धतीने बाबा झालाय. घरात तर तो बाबा आहेच. पण आता तो बाबा झालाय एका बिबट्याचा. घाबरु नका. त्याने हा बिबट्या घरी आणला नाही. तर हा बिबट्या प्राणीसंग्रहालयात असतो. पण त्याचा खर्च सुमित करतो. रिव्हर मार्च नावाच्या एका संस्थेच्या कार्यालयात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमित गेला होता.
अतिक्रमणामुळे नदीक्षेत्र कमी असलेल्या नद्यांना प्रवाही करण्यासाठी रिव्हर मार्च ही संस्था काम करते. त्यांच्यासोबत सुमितने मुंबईतल्या प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. तेव्हा तिथल्या प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांनी सांगितले की आम्ही इथले प्राणी दत्तक देतो. तेव्हापासून सुमित एका बिबट्याचे पालकत्व जगतोय. महिन्यातून एकदा त्याला जाऊन भेटून येतो. त्याच्याकडे पाहिल्यानंतर बिबट्याचा बाबा असल्याचा फील तो घेतो.
त्या बिबटयाचा सर्व खर्च सुमित करतो. जेणेकरुन त्याला आनंद ही मिळतो आणि बिबट्याचे संगोपनही तो करतो.
सध्या प्राणी दत्तक घेऊन त्या प्राण्यांना आपलंस करण्याची गरज जास्त निर्माण झाली आहे. अभिनेत्री नूतन ही त्या काळातलं एक मोठं उदाहरण आहे. तर सध्या अभिनेत्री बिंदू हिने असेच प्राणी दत्तक घेऊन माणुसकीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले. त्यांनी कुत्र्यांना दत्तक घेतले आहे.
अनेक संस्था मुंबई आणि भारतात आहे. ज्यामुळे आपल्याला प्राण्यांना दत्तक घेऊन त्यांचे जीवन आणि आपले जीवन सुखकर करता येईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस