जालना, २३ जुलै २०२२: जालना शहराजवळील नागेवाडी येथे दोन गटांत कंपनीमधील कामाच्या वादातून तुंबल हाणामारी झाली. यावेळी पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. जालना औरंगाबाद रोडवर नागेवाडीजवळ दोन गटांत झालेल्या मारहाणीत ३ जण जखमी झाले असून त्यानां दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ७ जणानां ताब्यात घेतलं आसून या ठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
बदनापुर पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड आपल्या खाजगी वाहानानं तपास करण्यासाठी जात असताना त्यांना जवळच्याच ढाब्यावर दोन गटांत हाणामारी सुरु असल्याचं पहायला मिळलं. हॉटेल पंजाब ढाबा समोर दहा ते पंधरा जणांच्या दोन गटांत हाणामारी लोखंडी पाईपनं चालू होती.
त्यानीं रोडवर थांबून भांडणं करु नका असं समजावण्यास सुरुवात केली. पण कोणीच त्यांचं ऐकत नव्हतं. सदर ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, या उद्देश्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ यांनी त्यांच्या.
जवळील शासकीय पिस्टलमधून एक राउन्ड हवेत वरच्या दिशेनं फायर केला. आणि या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, भांडणामध्ये ज्ञानेश्र्वर बांधुडे गणेश वांघुडे, कृष्णा वाळके हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांकडून सूरु आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर