अदानी कंपनीने बनवला गौरव बॉम्ब, हवेत तरंगत पोहोचतो शत्रूपर्यंत

नवी दिल्ली, ३१ जुलै २०२२: भारतीय वायुसेनेला अशा स्मार्ट बॉम्बची गरज होती जो स्वतः नेव्हिगेट करू शकेल आणि शत्रूच्या लक्ष्यांना नष्ट करू शकेल. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) या कामात मदत केली. शास्त्रज्ञांनी दोन प्रकारचे बॉम्ब तयार केले. डिझाईननंतर हा बॉम्ब बनवण्याची जबाबदारी उद्योगपती गौतम अदानी यांची कंपनी अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने घेतली होती. त्यांनी दोन्ही बॉम्ब तयार केले. पहिला म्हणजे विंगमधून ग्लाइड करणारा गौरव लाँग रेंज ग्लायड बॉम्ब (LRGB).

दुसरा आहे विंग्स नसलेला गौथम(Gautham). ही दोन्ही प्रेसिशन गाइडेड शस्त्रे आहेत. हे सामान्यत: अँटी-एयरक्राफ्ट डिफेंस मध्ये वापरले जातील ते रेंजबाहेरील लक्ष्ये नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरतील. यामुळे तुमचे फायटर जेट सर्वाइव करण्यात आणि कोलेटरल डॅमेजची शक्यता कमी होते. गौरव हा १००० किलो वजनाचा लांब पल्ल्याचा ग्लायड बॉम्ब आहे. त्याच वेळी, गौथम हा विंग्स नसलेला ५५० किलोचा बॉम्ब आहे. दोन्हीची लांबी ४ मीटर आहे. दोन्हीचा व्यास ०.६२ मीटर आहे.

गौरव आणि गौथम या दोन्ही बॉम्बमध्ये CL-२० म्हणजेच फ्रॅगमेंटेशन आणि क्लस्टर मुनिशन आहे. हा बॉम्ब टार्गेटशी संपर्क साधताच प्रॉक्जिमिटी फ्यूज़ करतो आणि स्फोटकांचा स्फोट होतो. गौरव बॉम्ब ची रेंज १०० किलोमीटर ग्लाइड करण्याची आहे. तर गौथम बॉम्बची रेंज विंग्स शिवाय ३० किमी ग्लाइड करण्याची आहे. हा बॉम्ब जास्तीत जास्त १० किमी उंचीपर्यंत जाऊ शकतो.

दोन्ही बॉम्बमध्ये इनर्शिअल नेव्हिगेशन सिस्टीम आहे. जे जीपीएस आणि नेव्हिक सॅटेलाइट गाइडेंस सिस्टमच्या मदतीने लक्ष्यापर्यंत पोचतात. हे बॉम्ब सुखोई Su-30MKI फायटर जेटवर तैनात केले जाऊ शकतात. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गौरवची बालासोरमध्ये सुखोई फायटर जेटमधून यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. यापूर्वी २०१४ मध्ये याची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. दोघांची सध्या ५० ते १५० किलोमीटरची अपग्रेडेड रेंज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा