मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा वादात? उद्द्यानाच्या नावावरुन गोंधळ, शिंदेंच्या हस्ते होणारं उद्घाटन रद्द

पुणे, ०२ ऑगस्ट २०२२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. मात्र, शिंदे पुण्यात पोहोचण्याआधीच त्यांचा पुणे दौरा वादात सापडलाय. शिंदे समर्थक माजी नगरसेवक नाना भानगिरे यांच्याकडून उभारण्यात आलेल्या उद्द्यानाचं नाव. या उद्द्यानाला एकनाथ शिंदे यांचं नाव देण्यात आलं आहे.

मात्र, या नावाचा ठराव महापालिकेत दिला असला तरी त्याला मंजूरी देण्यात आलेली नाही. या सोबतच हे उद्द्यान महापालिकेच्या जागेवर खासगी विकासकाकडून विकसित करण्यात आलं. त्यासाठीची हस्तांतरणाची तांत्रिक प्रक्रियाही अजून पूर्ण झालेली नाही.

मात्र आता मुख्यमंत्री या उद्द्यानाचं उद्धघाटन करणार नसल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री फक्त या उद्द्यानाला भेट देणार आहेत. यापूर्वी पंढरपूरमध्ये परवानगी नसलेल्या इस्कॉन टेंपलचं भूमीपूजन मुख्यमंत्री यांनी केल्यामुळे वाद उभा राहिला होता. मुळात मुख्यमंत्री कार्याल्याकडे असलेले प्रोटोकॉल ऑफिसर यांनी या बाबी तपासणे आवश्यक असतं.

तरीही या पद्धतीच्या चुका केल्या जात आहे. वैयक्तिक नाव न देण्याच्या पुणे पालिकेच्या ठरावाला केराची टोपली दाखवण्यात आलीय. हडपसर मधील उद्द्यानाला शिंदेचं नाव देण्यात आलेलं आहे. शिंदे समर्थक माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी हे नाव दिलं. शहरातील स्वयंसेवी संस्थांनीही या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा