महागाईचा भडका? सीएनजी आणि पीएनजीच्या दरात प्रचंड वाढ, पहा नवे दर

मुंबई, ०३ ऑगस्ट२०२२: महागाई कमी होण्याची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना आणखी एक झटका बसलाय. मुंबईत पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आलीय. मुंबईत सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. सीएनजीच्या किमतीत प्रति किलो सहा रुपये आणि पीएनजीच्या किमतीत चार रुपये प्रति एससीएम वाढ झालीय.

महानगर गॅस लिमिटेडने दरात वाढ जाहीर केलीय. गेलने सिटी गॅस कंपन्यांना पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमती वाढवल्या असून त्याचा बोजा सर्वसामान्य मुंबईकरांवर पडणार आहे‌‌. गेलने ०१ ऑगस्ट २०२२ पासून नॅचरल गॅसची किंमत १८ टक्कयांनी वाढवून प्रति युनिट १०.५ डॉलर केलीय.

महानगर गॅस लिमिटेडने एका निवेदनात म्हटलंय की, गॅसच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे, आम्ही खर्च कव्हर करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरमध्ये सीएनजी दराचा भडका उडाला आहे. कारण नागपूरात सीएनजी पेट्रोल – डिझेलपेक्षाही महाग विकलं जात आहे.

नागपुरात काल सीएनजी दर हा ११६ रुपये प्रति कीलो आहे. तर पेट्रोलचा दर हा १०६ रुपये ५ पैसे व डिझेलचे दर ९२ रुपये ६० पैसे आहे. देशातील सर्वात महाग सीएनजी हा नागपुर मध्ये ग्राहकांना खरेदी करावा लागत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा