पुणे, ३ ऑगस्ट,२०२२: सध्या सर्व वाहिन्यांवर ऐतिहासिक मालिका पहायला मिळातायत. ज्यात केवळ ऐतिहासिकच नाही, तर पौराणिक मालिकांचा सुळसुळाट झालाय. यात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, कृष्णा, अशा मालिका सध्या पहायला मिळतात.
एक काळ असा होता जिथं दुरदर्शनवर रामायण, महाभारत या दोनच मालिका होत्या. ज्या पहाण्यासाठी गावागावतच नव्हे तर शहरातही गर्दी होत होती. पण आता काळ बदलला आणि सगळीकडे त्याच प्रकारच्या मालिका पहायला मिळत आहे. राणी लक्ष्मीबाई, आनंदी बाई, सम्राट अशोक, महाराणा प्रताप, जोधा अकबर, चंद्रगुप्त मौर्य, रझिया सुलतान, चित्तोड की रानी पद्मिनी, वीर शिवाजी, धरती का वीर- पृथ्वीराज चौहान या हिंदी मालिका अनेक वाहिन्यांवर येऊन गेल्या.
मराठी वाहिन्यांवर सध्या स्वराज्य जननी जिजामाता, स्वामिनी, लक्ष्मी नारायण, सिंधू, याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तसेच गुरुदेव दत्त, गोरक्षनाथ, अशा अनेक मालिका अनके वाहिन्यांवर येऊन गेल्या.
केवळ मालिकाच नाही, तर याच धर्तीवर आता सिनेमेदेखील प्रदर्शित झाले आहे. जोधा अकबर, मोंहजोदारो, अशोका, बाजीराव मस्तानी, पानिपत, पद्मावत, मणिकर्णिका, तर क्रांतिकारकांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर शहीद भगतसिंग, मंगल पांडे, नेताजी सुभाषचंद्र बोस, अशा अनेक चित्रपटांची भर पडली आहे. ११ ऑगस्टला अमिरखानच्या लालसिंग चढ्ढाची यात भर पडणार आहे. त्यामुळे पुन्हा एक ऐतिहासिक चित्रपट या यादीत जमा होणार आहे.
जुनं ते सोनं असं म्हणत पुन्हा एकदा या सगळ्या विषयांना हात घातला जात आहे. त्यामुळं याचा एक फायदा असा होत आहे, की या क्रांतिकारकांचे शौर्य, पौराणिक मालिकांमधून पौराणिक कथा नवीन पिढीला समजू शकणार आहे. पण त्याचाच आणखी एक परिणाम म्हणजे या सर्व कथांमधून बदलण्यात आलेले विस्तार हे कितपत खरे आहे, याची सत्यता पडताळून पहात नसल्यानं चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहचू शकते.
त्यामुळं चांगल्या वाईट परिणामांसह पुन्हा एकदा या सर्व मालिका, चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळत आहे, हे खरं.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस