कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी आणखी एक पदक, मुरली श्रीशंकरने लांब उडीत जिंकले रौप्यपदक

Commonwealth Games 2022, ५ ऑगस्ट २०२२: २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची चांगली कामगिरी सुरूच आहे. मुरली श्रीशंकरने लांब उडीत रौप्यपदक पटकावले आहे. मुरलीने ८.०८ मीटरची सर्वोत्तम उडी मारून ही कामगिरी केली आहे. राष्ट्रकुल २०२२ च्या ऍथलेटिक्स स्पर्धेतील भारताचे हे दुसरे पदक आहे. यापूर्वी तेजस्वीन शंकरने उंच उडीत कांस्यपदक पटकावले होते. श्रीशंकर व्यतिरिक्त मोहम्मद अनीस याहियानेही अंतिम फेरी गाठली पण तो ७.९७ च्या सर्वोत्तम उडीसह पाचव्या स्थानावर राहिला.

बहामासच्या लेकुआन नायर्नने सुवर्णपदक पटकावले. त्यानेही ८.०८ मीटर उडी मारली. त्याच्या टर्न वर वाऱ्याचा वेग -०.१ असला तरी मुरलीच्या टर्नवर तो +१.५ होता. तसेच Lekual चा दुसरा सर्वोत्तम प्रयत्न श्रीशंकर पेक्षा चांगला होता. यामुळेच भारतीय खेळाडूला दुसरे स्थान मिळाले आहे.

भारतासाठी आतापर्यंत २० पदके

२०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला आतापर्यंत २० पदके मिळाली आहेत, ज्यात सहा सुवर्ण, सात रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे वेटलिफ्टिंगमध्ये दहा पदके आली आहेत. ज्युदोमध्ये तीन आणि अॅथलेटिक्समध्ये दोन पदके झाली आहेत. तसेच लॉन बॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि स्क्वॉश आणि पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताला पदक मिळाले आहे.

मुरली श्रीशंकर आणि मोहम्मद अनीस याहिया यांनी मंगळवारी पात्रता फेरीत चांगली कामगिरी केल्यानंतर पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. श्रीशंकरने पहिल्याच प्रयत्नात ८.०५ मीटर उडी मारून अंतिम फेरी गाठली. केरळमधील श्रीशंकर, २३, आठ मीटरची पात्रता गुण मिळवणारा त्याच्या गटातील एकमेव खेळाडू होता. दुसरीकडे, अनस याहियाने तीन प्रयत्नांत ७.४९ मीटर, ७.६८ मीटर आणि ७.४९ मीटर उडी मारून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. याहियाने दुसऱ्या प्रयत्नात आपली कामगिरी सुधारली आणि आपल्या गटात तिसरे स्थान पटकावले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा