इटालियन ओपन नोवाक जोकोविचच्या नावावर

रोम, २२ सप्टेंबर २०२०: विश्व क्रमांक १ खेळाडू नोवाक जोकोविच याने सोमवारी झालेल्या इटालियन ओपनच्या अंतिम फेरीत विजय मिळवत आपल्या कारकिर्दीतले ३६ वे विजेतेपद मिळविले.

नोवाक जोकोविच याने अर्जेंटिनाच्या डियेगो स्कावार्ट्समैन याला ७-८, ६-३ ने पराजित करत सामना जिंकला. मास्टर्स विजेतेपद मिळविण्याच्या बाबतीत जोकोविचने आता राफेल नदाल याला देखील मागे टाकले आहे. या सामन्यापूर्वी दोघेही ३५-३५ ने बरोबरीला होते. आता जोकोविचच्या नावे सर्वाधिक विजेतेपद आहेत. सर्बियाच्या या खेळाडूचे हे ५ वे रोमन विजेतेपद आहे. आणि २०१५ नंतर हे विजेतेपद त्याने आपल्या नावे केले आहे. फ्रेंच ओपनच्या आधी क्ले कोर्टवर हा विजय जोकोविच साठी खूप खास आहे.
         
९ वेळा रोम विजेतेपद मिळवणारा चॅम्पियन खेळाडू  राफेल नदाल या वेळी क्वार्टर फायनलमध्येच बाहेर झाला आहे. राफेल नदालला फायनलमध्ये पोहोचलेल्या स्कावार्ट्समैन याने पराजित केले होते, परंतु जोकोविच या सीजनमध्ये एकदा ही पराजित नाही झाला. यूएस ओपनच्या एका सामन्यात लाईन जजला चेंडू मारल्यामुळे त्याला डिस्क्वॉलिफाइ करण्यात आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा