नवी दिल्ली, १३ ऑगस्ट २०२२: तैवान आणि चीन यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हंटलंय की, २१ चिनी लष्करी विमानं आणि ६ चिनी नौदलाची जहाजं आमच्या परिसरात फिरत आहेत. याशिवाय, संरक्षण मंत्रालयाने ट्विट केलं की, आमच्या परिसरात ६ चीनी प्लान जहाजे आणि २१ पीएलए विमानं आढळून आली आहेत. दरम्यान, याप्रकरणी भारताची प्रतिक्रियाही समोर आलीय.
परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हंटलंय की, भारताला अलीकडच्या घडामोडींबद्दल चिंता आहे. अशा परिस्थितीत आम्ही सर्वांना संयम बाळगण्यास सांगतो. दुसरीकडं परराष्ट्र मंत्रालयानेही मनदीप कौरच्या आत्महत्येवर शोक व्यक्त केलाय.
मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, ही दुःखद घटना आहे. आमचे स्थानिक दूतावास स्थानिक अधिकारी, पोलिस आणि कुटुंबाच्या संपर्कात आहे. याशिवाय आम्ही यूएस फेडरल सरकारच्या संपर्कात आहोत. कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलं आहे. आम्ही सखोल चौकशीसाठी काम करत राहू.
याशिवाय रशियन तेलाशी संबंधित बाबींवर परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ऊर्जा सुरक्षा लक्षात घेऊन आम्ही तेल खरेदीबाबत आमचा निर्णय घेऊ. त्याचवेळी नाटोशी अनेक पातळ्यांवर आमची चर्चा सुरू आहे.
तैवाननेही कट्टर चीनच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केलीय. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आलाय की, तैवानने देखील चीनच्या हल्ल्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी युक्ती सुरू केली आहे. तैवानच्या आठव्या आर्मी कॉर्प्सचे प्रवक्ते लू वोई-जे यांनी पुष्टी केली की पिंगटुंगच्या दक्षिणेकडील काउंटीमध्ये तोफखाना आणि शस्त्रास्त्रांचा सराव सुरू झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे