कार डिव्हायडर वर धडकून भीषण अपघात, अपघातात एक ठार, तीन जण गंभीर जखमी

पुणे, २६ ऑगस्ट २०२२: पुणे नगर रोडवर शिक्रापूर येथे भरधाव कार डिव्हायडरवर धडकून, झालेल्या भीषण अपघातामध्ये एक जण ठार झाला आहे. तर तीन जन गंभीर जखमी झाले आहेत. अमोल संभाजी फुले, वय ३५, राहणार सासवड हे मृत झाले आहेत तर वैभव सुभाष कुंभारकर, वय २८, अनिकेत उर्फ बाबू शरद चौखंडे, वय २३ दोघेही राहणार सासवड,नितीन बबन देशमुख, वय ३१, राहणार केडगाव, अहमदनगर हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त कारमधील चौघेजण अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने जात होते. परंतु वाटेतच काळानं त्यांच्यावर घाला घातला. या अपघातातून तिघे जण वाचले असले तरी ते मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर खासगी सूर्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींना स्थानिकांनी दवाखान्यात दाखल केले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात तिघे जण सासवडचे राहणारे होते तर एक जण अहमदनगर येथील केडगावचा राहणारा आहे.
शिक्रापूर येथील पोलीस नाईक अंबादास थोरे यांनी या अपघातप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी– अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा