पुणे, २७ ऑगस्ट २०२२ : आज पासून आशिया चषक २०२२ ची (Asia Cup 2022) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (Sri Lanka vs Afghanistan) संघातील सामन्याने होईल. दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना रंगेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७:३० वाजता सामना चालु होइल.
एकूण सहा संघ आशिया कप जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. यादरम्यान भारतीय संघ हे विजेतेपद पटकावण्याचे आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाची तयारी मजबूत करण्याचे ध्येय ठेवणार आहे.
आशिया कप मधील क्रिकेट सामन्यांवर सध्या सर्वांचेच लक्ष असून २८ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायवोल्टेज सामना रंगणार आहे.
आशिया कप २०२२ स्पर्धेची सुरुवात आज पासून होणार असून ११ सप्टेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
आशिया चषक स्पर्धा आता काही तासांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांची सर्वांना उत्सुकता आहे.
आशिया चषकातील सर्व सामन्यांचा टॉस हा संध्याकाळी ७.०० वाजता होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने हे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहेत. हे सर्व सामने रात्री १०.३० ते ११.३० पर्यंत संपतील असा अंदाज आहे. पण सामन्यामध्ये जर कोणता व्यत्यय आला तर सामने उशिरा संपू शकतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव