पुणे, ३० ऑगस्ट, २०२२ : दूरदर्शनवरची पहिली मालिका.. आपण यांना पाहिलतं का? तुम्हाला आठवते? ज्यावर हरवलेल्या लोकांचे फोटो, नाव आणि संपर्क नंबर यायचा. ज्यानुसार जर तुम्हाला काही माहिती मिळाल्यास तुम्ही ती माहिती संपर्क नंबर देऊन तुम्ही त्या हरवलेल्या लोकांना शोधायला मदत होऊ शकायची.
हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आज आहे हरवलेल्या व्यक्तींना, अनैच्छिक रित्या पळवलेल्या आणि न सापडलेल्या व्यक्तींना आठवण्याचा आंतरराष्ट्रीय दिवसं. रोजच्या वर्तमानपत्रात किंवा टिव्हीवरुन आपण कायम पळवून नेल्याच्या बातम्या ऐकतो, वाचतो. पण यातल्या अनेक व्यक्ती परत मिळत नाही. ज्याच्या आठवणीत आयुष्य निघून जातं. त्यामुळे अशांना आठवून त्यांच्या स्मृती जागा करण्याचा दिवस म्हणून ३० ऑगस्ट या दिवसाची ओळख आहे. हजारापैकी साधारणपणे शंभर लोकं दिवसाला गायब होतात. पळून जातात किंवा त्यांना पळवलं जातं. पण त्या व्यक्ती कधीच सापडत नाही. ज्याचा परिणाम त्यांच्या कुटूंबावर होतो. कुटूंब उद्ध्वस्त होतं.
यात जास्त प्रमाणात महिलांचा, नंतर लहान मुलांचा समावेश आहे. यात काही वेळा घरातल्या कमावत्या व्यक्तीला पळवून नेल्याने कुटूंबावर आघात होतो.
अशा लोकांसाठी किंवा त्यांच्या कुटूंबासाठी मानव अधिकाराने काही महत्वाचे कायदे केले आहेत.
ज्यात ती व्यक्ती जिवंत आहे की मृत आहे, हे शोधण्यासाठी प्रयत्न करणे.
काही वर्षानंतर जर ती व्यक्ती परत आली नाही, तर तिला मृत घोषित करणे.
जर परत आल्यास त्या व्यक्तीची रितसर नोदं करणे. ज्यासाठी कायद्याचा आधार घेणे गरजेचे आहे.
हा एक प्रकार झाला. पण दुसऱ्या प्रकारात घरातली व्यक्ती कुटूंबाला त्रास देते आणि नंतर निघून जाते. अशी व्यक्ती परत आल्यास ती पुन्हा त्रास देऊ नये, यासाठी कायद्याचा आधार घेणे. त्या व्यक्तीवर मानसिक उपचार करणे. अशा गोष्टींची कायद्यात तरतूद केली आहे.
यातील खूप साऱ्या व्यक्ती या मनोविकाराने ग्रासले असल्याने घरातल्या व्यक्तींना मारणे, छळणे आणि नंतर निघून जाणे, अशा कृती करतात.
अशा मृत्यू झालेल्या, हरवलेल्या व्यक्तींना आज आठवून त्यांना माफ करण्याचा दिवस म्हणून ३० ऑगस्टला विशेष मह्त्व प्राप्त झाले आहे. या लोकांच्या कृत्याला माफ करत त्यांना नमन करत त्यांना आठवून आपण आजच्या दिवशी त्यांच्या स्मृतीला उजाळा देणं, हेच आपल्या हातात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस