उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष पद घेताच भूपेंद्र चौधरी यांनी का दिला मंत्रिपदाचा राजीनामा?

7

उत्तर प्रदेश;३० ऑगस्ट २०२२: उत्तर प्रदेश भाजपा प्रदेश अध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेतलेल्या नंतर भूपेंद्र चौधरी यांनी पंचायत राज मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय, अशी त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

भारतीय जनता पक्षाचे नवनीयुक्त अध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी आपल्या ट्विट मध्ये लिहतात की भाजपा च्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारी साठी मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सरकार मध्ये राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या कार्यकाळात राज्यातील जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि वेळोवेळी दिलेल्या सूचना, प्रेरणादायी मार्गदर्शन आणि आशीर्वादासाठी मी पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो.

सामान्य कार्यकर्त्याला इथपर्यंत पोहोचवणं ही भाजपची ताकद!

भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांनी सोमवारी लखनौमध्ये पदभार स्वीकारल्या नंतर ते म्हणाले की मी जिल्हाध्यक्ष आणि आता प्रदेशाध्यक्ष आहे. जिल्हाध्यक्ष असताना लोक माझ्या विरोधात होते. पण मी काम करत राहिलो आणि जनतेचा आशीर्वाद घेतला. माझ्या पक्षानं मला मोठा सन्मान दिलाय. आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उत्तर प्रदेशच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाने नियुक्त केलंय. केंद्र आणि राज्याचे नेतृत्व आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या स्नेह आणि विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा