६७ वा फिल्मफेअर पुरस्कार: सरदार उधम, शेरशाह सिनेमांनी मारली बाजी

मुंबई ३१ ऑगस्ट २०२२: बॉलिवूड सिनेमांचे जेवढे चाहते असतात तेवढेच चाहते बॉलिवूडच्या झगमगीत पुरस्कार सोहळ्यांचे असतात. फिल्मफेअर पुरस्कार सोहळा यापैकीच एक. दरम्यान ६७ वा पुरस्कार सोहळा पार पडला.

बॉलिवूडमधील सगळ्याच कलाकारांना फिल्मफेअर पुरस्काराचं भलतंच आकर्षण असतं. हा सोहळादेखील थाटात पार पडतो. सिनेसृष्टीतले मोठमोठे स्टार्स या सोहळ्याला हजेरी लावतात. त्यांची आकर्षक आणि उठावदार वेशभूषा ही आकर्षणाचं केंद्रबिंदू असते.

यंदाचा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार सिद्धार्थ मल्होत्राच्या शेरशाह या चित्रपटाला मिळाला आहे. तर मिमी या चित्रपटासाठी क्रिती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर मित्रांच्या जोडीने या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

अभिनेत्री सई ताम्हणकर हे नाव जेवढं मराठी मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये गाजतं आहे, तेवढाच या अभिनेत्रीचा डंका बॉलिवूडमध्येही आहे. सईने यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला असून, आयफा जिंकल्यानंतर आता हा आणखी एक पुरस्कार तिच्या नावावर झाला आहे. सईला यावर्षी मिळालेला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार ‘मिमी’ या सिनेमासाठी मिळाला आहे. मिमीमध्ये सईने साकारलेल्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं होतं. आता या भूमिकेसाठी मिळणारे पुरस्कार सईच्या याच कामाची पोचपावती आहेत. तिला हा पुरस्कार ‘मिमी’ या सिनेमातील ‘शमा’च्या भूमिकेसाठी मिळाला. सईने मिमी या सिनेमात क्रिती सेनॉन अर्थात मिमीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. ६७ व्या फिल्मफेअर पुरस्कारांच्या विजेत्यांची नावे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कृति सेनॉन (मिमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणवीर सिंह (८३)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सई ताम्हणकर (मिमी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पंकज त्रिपाठी (मिमी)
सर्वोत्कृष्ट सिनेमा (क्रिटिक्स)- सरदार उधम
सर्वोत्कृष्ट सिनेमा (पॉपुलर)- शेरशाह
सर्वोत्कृष्ट सिनेमा- शेरशाह
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- विष्णु वर्धन (शेरशाह
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स)- विद्या बालन (शेरनी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स)- विक्की कौशल (सरदार उधम)

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा