पुणे-सोलापूर महामार्गावर तीन कोटी साठ लाख रुपये लुटणारे ताब्यात

भिगवण, ३१ ऑगस्ट २०२२: पुणे-सोलापूर राष्ट्रिय महामार्गावर इंदापूर जवळ गाडीवर गोळीबार करुन तीन कोटी साठ लाख रुपये लुटुन धुम ठोकणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेला यश आले आहे.

ग्रामीण पोलीसचे अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हेच पत्रकार परिषद घेउन माहिती देणार आहेत. २६ ऑगस्ट रोजी पहाटे पुणे-सोलापूर महामार्गावर वरकुटे बुद्रूक येथे ही घटना घडली होती. स्कॉर्पियो गाडीला अडवून व गोळीबार करीत गाडीतील दोघांना मारहाण करीत साडेतीन कोटी लुटण्यात आले होते.

या रोड रॉबरीनंतर अवघी पोलिस यंत्रना कामाला लागली होती. अभिनव देशमुख यांनी तपासासाठी पथके तैनात केली होती. त्यानुसार रात्रंदिवस याचा तपास चालू होता. अखेर काही चोरांना अटक करण्यात आले व बरीच रक्कम हस्तगत करण्यात आली. पकडण्यात आलेले चोरटे हे सोलापूर व इंदापुर तालुक्यातील असल्याचे समजते.

या लुटीत दहाहुन अधिक चोरांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रक्कम लुटल्या नंतर काही चोर गुजरातला फिरायला गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेत्तले आहे. या पुढील तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा