रशिया कडून जर्मनीचा गॅस पुरवठा बंद…

मॉस्को, ३ सप्टेंबर, २०२२ : रशियाकडून जर्मनीला होणारा गॅस पुरवठा काही काळासाठी स्थगित केला असल्याचं रशियाची कंपनी गाझप्रोमतर्फे सांगण्यात आलं. सध्या जर्मनीला होणारा पाईपलाईनमधून गॅसचा पुरवठा तात्पुरता खंडित केला आहे. जर्मनीकडे सध्या ८४ टक्के गॅस असून पाईपलाईनच्या मेंन्टेनंन्ससाठी हा पुरवठा पुढील तीन दिवस बंद ठेवण्यात आला आहे.
रशियातल्या नॉड स्ट्रिम-१ या पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा पुरवठा बंद करण्यात आला आहे. गाजप्रोम यांनी सांगितलं की, रशिया ते जर्मनी येथे पुरवठा करणाऱ्या पोर्तोवाया या गावात पाईपलाईमध्ये खूप मोठा बिघाड झाल्याने गॅस गळती सुरु होण्याची शक्यता होती. असं स्पष्टीकरण रशियाकडून देण्यात आलं. रशियाने युक्रेनबरोबरच्या युद्धाचा फायदा घेत इतर युरोपियन देशांना होणारा गॅस सप्लाय देखील कमी केला आहे. तसेच गॅसचे दर वाढवल्याने इतर देशांना गॅससाठी जास्त रक्कम मोजावी लागत आहे.

मात्र जर्मनीकडून वेगळ्या प्रकारचे उत्तर माध्यमांना मिळाले. रशिया युक्रेनच्या युद्धात रशिया कधीही युक्रेनवर कब्जा करु शकते. मधेच गॅस सप्लाय बंद करु शकतो. याच पार्श्वभूमीवर जर्मनीने सुरक्षित पाऊल उचलून सध्या रशियाकडून मिळणारा गॅस पुरवठा थांबवला आहे.
रशियात सर्वात जास्त नैसर्गिक गॅस निर्मिती होते. वीज, ऑफिसेस किंवा इतर ठिकाणी गॅस जास्त प्रमाणात लागतो. जर्मनीने मधल्या काळात म्हणजे जूनच्या दरम्यान कॅनडाकडून गॅस विकत घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळेच रशियाने गॅस सप्लाय बंद केला असावा, असा अंदाज जर्मनीने वर्तवला आहे. त्यातही रशियाने केवळ २० टक्क्यांनी गॅस सप्लाय केल्यामुळे जर्मनीवर कदाचित गॅस पुरवठ्याचा तुटवडा काही काळात होऊ शकला असता.

यावर जर्मनीने उपाय म्हणून कॅनडाचा पर्याय अवलंबला आणि कॅनडाकडून गॅस घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे सध्या कॅनडाकडून होणारा गॅस पुरवठा हा जर्मनीसाठी उपयोगी पर्याय ठरत आहे. पण यामुळे रशियाचे गॅस क्षेत्रातील वर्चस्व कमी होणार आहे. यामुळे रशिया युक्रेन युद्धानंतर रशिया नक्की काय पाऊल उचलणार याकडे सर्व देशांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा