मुंबई, ५ सप्टेंबर २०२२: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दहा जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खालापूर पोलीस ठाणे हद्दीत बस पलटी होऊन आणि इको स्पोर्ट गाडीचा टायर फुटून अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी बचाव कार्य करण्यासाठी गेलेल्या डेल्टा फोर्सच्या गाडीला आज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये एकुण दहा जण जखमी झाले आहेत. या अपघातात अश्र्विनी पवार ३२, नैतिक पवार ०६, दोघे राहणार जोगेश्र्वरी, संजय माने वय ४० नेरुळ, अरुष हाके वय १० राहणार मानखुर्द, निंदा नलावडे वय २१ राहणार दहीसर आणि ज्योती कांबळे वय ३४ राहणार भाइंदर हे जखमी झाले आहेत.
तर होमगार्ड लक्ष्मण आखाडे वय ३०, पोलीस शिपाई चौहाण, दिपेश हातनोलकर २६, डेल्टा फोर्स जीप चालक गुलाब नलावडे वय ३७ अशी मदत करताना जखमी झालेल्यांची नावे आहेत. सर्व जखमींना कामोठो येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, पुढील तपास पोलीस करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर