लंडन, ६ सप्टेंबर २०२२: ब्रिटनचे नवे पंतप्रधान लिझ ट्रस आज शपथ घेणार आहेत. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे यावेळी शपथविधी सोहळा होणार आहे. हा सोहळा सहसा लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये होतो, परंतु ब्रिटनच्या राणी सध्या स्कॉटलंडमध्ये आहे. त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव प्रवास करता येणार नाही. त्यामुळे मंगळवारी म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी स्कॉटलंडमध्ये किसिंग सेरेमनी आणि नव्या पंतप्रधानांचा शपथविधी होणार आहे.
जॉन्सन पंतप्रधान म्हणून आपले शेवटचे भाषण पीएम हाऊस १० डाउनिंग स्ट्रीट येथून करणार आहेत. त्यानंतर राणीकडे राजीनामा सुपूर्द करण्यासाठी ते स्कॉटलंडमधील अबर्डीनशायर येथे जाणार आहेत. सध्या, राणी एलिझाबेथ येथे आहेत. ९६ वर्षीय राणींना चालताना त्रास होतो, या कारणास्तव जॉन्सन आणि लिझ दोघेही त्यांच्याकडे जातील.
ब्रिटीश पंतप्रधानांचा शपथविधी समारंभ सहसा लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये होतो, परंतु यावेळी तो स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे होईल. राणी सध्या स्कॉटलंडमध्ये आहे.
जॉन्सन राणीकडे राजीनामा सादर करतील. यानंतर लिझ राणीला भेटतील. पारंपारिकपणे या भेटीला ‘किसिंग हँड्स’ सेरेमनी म्हणतात. मात्र, यावेळी राणींची प्रकृती खालावल्याने हा सोहळा प्रतिकात्मक असेल.
अधिकृत नियुक्ती होताच नवीन पंतप्रधान लिझ लंडनला परततील. येथे १० डाउनिंग स्ट्रीटवरून त्यांचे पहिले भाषण होईल.
लंडनच्या वेळेनुसार दुपारी चारच्या सुमारास भाषण दिल्यानंतर पंतप्रधान लिझ आपल्या मंत्रिमंडळाची नियुक्ती करतील. राणी झूम कॉलवर मंत्र्यांना शपथ देतील. त्यांचे विभागप्रमुख मंत्र्यांना ‘सील की सील’ देण्याचा विधी पूर्ण करतील.
नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक बुधवारी (७ सप्टेंबर) होणार आहे. यानंतर पंतप्रधान लिझ प्रथमच सभागृहात (हाऊस ऑफ कॉमन्स) पोहोचतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे