काँग्रेस ने पाकिस्तानात भारत जोडो यात्रा’ करावी, CM हिमंता सरमा यांची राहुल गांधी वर टिका

12

नवी दिल्ली, ७ सप्टेंबर २०२२ : काँग्रेसचे माजी नेते आणि आसामचे विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे वर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला आहे. ही यात्रा पाकिस्तानात करावी. कारण, भारत एकसंध आहे, तो कधीही तुटलेला नाही. पुढे बोलतात की, १९४७ मध्ये काँग्रेस अंतर्गत भारताची फाळणी झाली होती. आता काँग्रेसनं भारत जोडो यात्रे साठी पाकिस्तानात जाणे राहुल गांधींनी ही यात्रा पाकिस्तानात नेली पाहिजे. कारण, संपूर्ण भारत एकसंध आहे

आजपासून काँग्रेस पक्षाची ‘भारत जोडो यात्रा’ सुरू होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आज दक्षिणेतील कन्याकुमारी येथून या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. तिथून हा प्रवास सुरू होऊन काश्मीरपर्यंत जाईल. ही एक पदयात्रा असेल जी देशभरातून जाणार आहे. या यात्रेची काँग्रेस पक्षात अनेक दिवसांपासून तयारी चालू आहे. राहुल गांधी आज या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.

काँग्रेसची ही पदयात्रा पाच महिने चालणार तर या मोहिमेत पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते पाच महिने सर्व राज्यांमध्ये पदयात्रा करणार आहेत. या पाच महिन्यांत १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश देखिल असणार आहे. या संपूर्ण प्रवासाचं एकूण अंतर सुमारे ३५००० किलोमीटर आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून हा प्रवास सुरू होईल आणि तिरुवनंतपुरम, कोची, निलांबूर, म्हैसूर, बेल्लारी, रायचूर, विकाराबाद, नांदेड, जळगाव, इंदूर, कोटा, दौसा, अलवर, बुलंदशहर, दिल्ली, अंबाला, पठाणकोटमार्गे उत्तरेकडं जाईल आणि शेवटचा टप्पा जम्मू आणि श्रीनगरमध्ये संपणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे