आसनसोल, ७ सप्टेंबर २०२२: आसनसोल येथील ‘इस्टर्न कोलफिल्ड्स’ च्या खाणीतून कोळशाच्या कथित तस्करी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पश्चिम बंगालचे कायदा मंत्री मलय घटक यांच्या घरी कार्यालय आणि इतर ठिकाणी छापा टाकला. ही माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण सहा ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.
नोव्हेंबर, २०२० मध्ये, सीबीआयने अनुप मांझी उर्फ जाला, ईसीएल महाव्यवस्थापक अमित कुमार धर आणि जयेश चंद्र राय, ईसीएल सुरक्षा प्रमुख तन्मय दास, कुनुस्टोरिया क्षेत्र सुरक्षा नीरीक्षक धनंजय राय आणि कमजोर क्षेत्र सुरक्षा प्रभारी देवाशीष मुखर्जी यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.
पाचम वर्धमान जिल्हातील आसनसोल येथील घटक यांच्या तीन घरांवर आणि कोलकाता येथील लेकर गार्डन भागातील एका धरावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. त्यांचे नाव, कोळसा तस्करी प्रकरणात समोर आले आहे. या घोटाळ्यात घटक यांचा सहभाग असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड