दसरा मेळाव्याची कोणालाच परवानगी ना,ही भाजप मंत्र्यांचा दावा

मुंबई, ८ सप्टेंबर २०२२ : शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायला मिळत आहे. मुंबईच्या नागरी संस्थांकडून दोन्ही गटाची परवानगी नाकारली जाऊ शकते आणि दुसऱ्या ठिकाणी मेळावा घेण्याच्या सूचना देखिल देण्यात येऊ शकतात, असा दावा भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे दोन्ही गटात चर्चांना उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडल आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला कारण शिवसेनेच्या अनेक आमदारांनी भाजपसोबत जाऊन नवीन सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेचा महत्त्वाचा कार्यक्रम असून यावर्षीचा दसरा मेळावा कोण घेणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी परवानगीसाठी अर्ज केला आहे. पण कुणालाच अजून परवानगी मिळाली नाही.

दसरा मेळाव्यासाठी आता महापालिकेचे आयुक्त निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी मिळत आहे. कारण सध्या महापालिकेचा कार्यकाळ संपल्याने प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अजून निवडणुका जाहीर झाल्या नाहीत त्यामुळे परवानगीचा निर्णय महापालिका आयुक्त कडे असू शकतो. सध्या शिवसेना आणि शिंदे गटातील वाद सुप्रीम कोर्टात गेला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षातील ४० आमदार असल्याने ते पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा करू शकतात असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत. तर दसरा मेळाव्यासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही मैदानावर निर्बंध घातले गेले नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिल्याचं त्यांनी सांगितल आहे.

या दरम्यान, उद्धव ठाकरे बोलतात की य शिवसेना मेळावा आम्हीच घेणार, आमच्या दसरा मेळाव्यासाठी कोणी पण आम्हाला रोखू शकणार नाही, पण अजून परवानगी मिळाली नसल्याने शिवतीर्थावरील मेळाव्यावर प्रश्नचिन्ह उभे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा