Neeraj Chopra Diamond League Final, ९ सप्टेंबर २०२२: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राची चमकदार कामगिरी सुरूच आहे. नीरज चोप्राने डायमंड लीग फायनलमध्ये ८८.४४ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह विजेतेपद पटकावले आहे. हे विजेतेपद पटकावणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू आहे. नीरजने यापूर्वी २०१७ आणि २०१८ मध्येही अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती, जिथे तो अनुक्रमे सातव्या आणि चौथ्या स्थानावर होता. मात्र यावेळी नीरजने डायमंड ट्रॉफी जिंकून आणखी एक यश संपादन केले.
झुरिच येथे झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये नीरजची सुरुवात खराब झाली होती आणि त्याचा पहिला थ्रो फाऊल होता. मग दुसरा प्रयत्न. नीरजने तिसऱ्या प्रयत्नात ८८.०० मीटर, चौथ्या प्रयत्नात ८६.११ मीटर, पाचव्या प्रयत्नात ८७.०० मीटर आणि सहाव्या प्रयत्नात ८३.०० मीटर फेक केली.
डायमंड लीगच्या अंतिम फेरीत, चेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेच ८६.९४ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरा आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर (८३.७३) तिसरा आला. नीरजने २०२१ मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण, २०१८ मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण, २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, २०२२ मध्ये जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. डायमंड ट्रॉफी जिंकण्याची त्याची इच्छा होती, जी आता पूर्ण झाली आहे.
अशी झाली फायनल
नीरज चोप्राने २०२२ मध्ये डायमंड लीगच्या फक्त २ लेग्समध्ये भाग घेतला होता. यादरम्यान, त्याने लॉसने लेग जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला आणि स्टॉकहोममध्ये दुसरे स्थान मिळवले. नीरजने १५ गुणांसह अंतिम फेरीत धडक मारली होती. जेकब वडलेच (४ स्पर्धांमध्ये २७), ज्युलियन वेबर (३ स्पर्धांमध्ये १९) आणि अँडरसन पीटर्स (२ स्पर्धांमध्ये १६) टॉप-३ स्थानांवर राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
मात्र, वर्ल्ड चॅम्पियन अँडरसन-पीटर्स दुखापतीमुळे फायनल खेळू शकले नाहीत. डायमंड लीग लेगमधील प्रत्येक खेळाडूला प्रथम स्थानासाठी ८ गुण, द्वितीय स्थानासाठी ७, तृतीय स्थानासाठी ६ आणि चौथ्या स्थानासाठी ५ गुण दिले जातात.
डायमंड लीग फायनलमध्ये नीरज चोप्राची कामगिरी:
पहिला प्रयत्न – फाऊल
दुसरा प्रयत्न – ८८.८४ मी
तिसरा प्रयत्न – ८८.०० मी
चौथा प्रयत्न – ८६.११ मीटर
पाचवा प्रयत्न – ८७.०० मी
सहावा प्रयत्न – ८३.६० मीटर
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे