राजकारण खालच्या पातळी वरून वरती नेण्याचा आमचा प्रयत्न

पुणे, ९ सप्टेंबर २०२२, दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधांनंतर राज्यसह पुण्यात गणपती विसर्जनाला उत्साहात सुरुवात झाली आहे. पुण्यातील मंडई परिसरात असलेल्या टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माझी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित पवार, भाजपचे नेते व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे आज मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी सहभागी झाले आहेत. तेव्हा शिवसेनेचे युवा नेते व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. तेव्हा त्यांनी मानांच्या गणपतीचे दर्शन घेतले. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला.

आदित्य ठाकरे म्हणाले, आज गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आहे. मी आज राजकारणावर काही बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील आजचे राजकारण खूप वाईट आहे. ते राज्यासाठी, विकासासाठी नक्कीच चांगले नाही. लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल इतके आजचे वाईट राजकारण होत आहे. राजकारण खालच्या पातळीवर आले आहे. त्याचा स्तर वरती आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. असे आदित्य ठाकरे म्हणाले.

नीलम ताई, चंद्रकांत दादा, अजित दादा, आज भेटले त्यांच्यात राजकारण विषयी काही चर्चा झाली नाही. उत्सवी वातावरण आहे. त्यामुळे राजकीय विषय नको. अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा