पुणे, १४ सप्टेंबर २०२२: भारत आणि चीनच्या सैन्याने मंगळवारी पूर्व लडाख सेक्टरमधील पेट्रोलिंग पॉइंट -१५ जवळील गोगरा हाइट्स-हॉट स्प्रिंग्स भागात डिसइंगेजमेंट प्रक्रिया (सैन्य मागं घेण्याची प्रक्रिया) पूर्ण केली आहे. सरकारी सूत्रांनी सांगितलं की, दोन्ही बाजूंनी सैन्याने स्टँडऑफ साइटवरून माघार घेतल्यानंतर एकमेकांच्या स्थितीची पडताळणी पूर्ण केलीय. सरकारच्या सुरक्षा अधिकार्यांना वाटतं की येथून सैन्य मागं घेण्यापूर्वी, पूर्व लडाखमधील एलएसीवरील दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या दिशेनं काम करायला हवं होतं.
ते म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही बाजूंनी नियमितपणे आयोजित केलेल्या लष्करी चर्चेच्या दीर्घ चर्चेनंतर PP-15 क्षेत्रातून चिनी माघार घेणं शक्य झालंय. सूत्रांनी सांगितलं की, एनएसएच्या सुरक्षा दलांना स्पष्ट सूचना होत्या की त्याची अंमलबजावणी करताना भारतीय हितांशी तडजोड केली जाऊ नये.
मे २०२० पर्यंत कोणत्याही संभाव्य चिनी हल्ल्याला तोंड देण्यासाठी भारताने पूर्व लडाख सेक्टरमध्ये ५०,००० हून अधिक सैन्य तैनात केलं आहे.
२०२० नंतर वाढला होता गतिरोध
५ मे २०२० रोजी पूर्व लडाख सीमेवरील पॅंगॉन्ग लेक भागात हिंसक चकमकी झाल्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये एकमेकांना विरोध करण्यास सुरुवात झाली होती.. दोन्ही बाजूंनी हळूहळू हजारो सैनिक आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रं पाठवली. लष्करी आणि राजनैतिक चर्चेदरम्यान, दोन्ही देशांनी पँगॉन्ग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनार्यावर आणि गोगरा परिसरात गेल्या वर्षीच डिसइंगेजमेंट प्रक्रिया पूर्ण केली आहे. पँगॉन्ग सरोवर परिसरात गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये डिसइंगेजमेंट झाली होती, तर गोग्रा येथील पेट्रोलिंग पॉईंट १७ (A) वरून सैन्य मागं घेण्याची कारवाई गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झाली होती.
समस्येवर दीर्घकालीन उपाय असायला हवा
सूत्रांनी सांगितलं की, भारत आणि चीनने संपूर्ण सेक्टरमध्ये एक लाखाहून अधिक सैन्य तैनात केले आहे, भारताने या परिस्थितीचा फायदा घेऊन डीबीओ सेक्टर आणि डेमचोक सेक्टरवर तोडगा काढला पाहिजे, जिथे चिनी भारतीय गस्त रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. या भागातून लष्कर मागं घेण्यापूर्वी परिस्थितीवर काही दीर्घकालीन तोडगा काढला पाहिजे, असं राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांचं मत आहे.
हॉट स्प्रिंग्स आणि गोगरा पोस्टमधून सैन्य मागं घेण्याचं महत्त्व
PP 15 आणि PP 17A त्या भागात आहेत जिथं LAC संरेखनावर भारत आणि चीन यांच्यात मोठ्या प्रमाणात सहमती झालीय. २०२० च्या घटनेनंतर, चीनी सैन्याने हॉट स्प्रिंग्स-गोगरा भागात आपली तैनाती वाढवली. हॉट स्प्रिंग्स-गोगरा भागातून सैन्याने माघार घेतल्यानं भारताचा चीनसोबतचा तणाव कमी होईल कारण ते २०२० मध्ये चिनी सैन्याने तयार केलेल्या सर्व नवीन फ्रिक्शन प्वाइंटवर अधिकृतपणे संघर्ष संपवंल.
डेमचोक आणि डेपसांगमध्ये अजूनही सैन्य आमनेसामने
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय लष्कर आणि चिनी लष्कराने गोगरा (PP17A) येथे तैनाती थांबवली होती आणि दोन्ही देशांचे सैनिक त्यांच्या कायमस्वरूपी तळावर परतले होते. हा विकास २०२१ मध्ये पूर्व लडाखमधील चुशूल मोल्डो मीटिंग प्वाइंटवर भारत आणि चीनच्या कॉर्प्स कमांडर्समधील चर्चेच्या १२ व्या फेरीनंतर झाला.
फेब्रुवारी २०२१ मध्ये, दोन्ही देशांच्या सैन्याने पॅंगॉन्ग त्सो परिसरातून सैन्य पूर्णपणे मागं घेतलं. पण एलएसीवरील डेपसांगमध्ये अजूनही दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आहेत. तथापि, येथील स्टँडऑफ २०२० च्या घटनेच्या आधीची आहे. डेपसांग आणि चार्डिंग नाला भागातील भारताच्या पारंपारिक गस्ती क्षेत्रांमध्ये चिनी सैन्याने प्रवेश रोखला आहे. डेपसांग भारताच्या उपक्षेत्र उत्तर (SSN) अंतर्गत येतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे