नाशिक, १४ सप्टेंबर२०२२: पोलिस आयूक्तालयात गैरव्यवहारांच्या चर्चाना जोर वाढला असून आयूक्तालयातील एका सहायक आयूक्ताकडे नियंत्रन कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे बदलीची ऑर्डर मध्यरात्री दीड वाजता संबंधीत अधिकाऱ्यास दिल्याने पोलिस वर्तृळात तो चर्चेचा विषय बनला आहे.
तर एका पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकाचा गैरव्यवहार समोर आल्याने त्यांच्याकडील सर्व गुन्ह्यांचा तपास इतर अधिकाऱ्याला वर्ग करुन संबंधिताची खातेअंतर्गत चौकशी सुरु केल्याचे सांगितले जात आहे. शहरातील एका पोलिस ठाण्यातील गुन्हे निरीक्षकाने एका उद्योजकाकडून पैशांसह काही चैनीच्या वस्तू घेतल्याचे बोलले जात आहे.
तसेच उद्योजकाच्या कंपणीत ठेकाही घेतल्याचे समजते आहे. त्यामुळे संबंधीत निरीक्षकाचीही खातेअंतर्गत चौकशी सुरु असल्याचे सांगितले जात आहे. वरिष्टांनी या अधिकाऱ्याकडील सर्व गुन्ह्यांचा तपास इतर अधिकाऱ्याला सोपवला असून अद्याप नवीन जबाबदारीही दिली नसल्याचे समोर आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर